कविवर्य पांडुरंग घोलप यांचा मायभूमीत सन्मान
पांडुरंग घोलप यांच्या "शब्दफुले" काव्यसंग्रहाचे कौतुक
कविवर्य पांडुरंग घोलप यांचा मायभूमीत सन्मान
पांडुरंग घोलप यांच्या “शब्दफुले” काव्यसंग्रहाचे कौतुक
पुणे शहर प्रतिनिधी
पुणे: (दि.२६): प्रजासत्ताक दिनानिमित्त मा.कविवर्य पांडुरंग घोलप यांचा त्यांच्या जन्मभूमीत साहित्यिक प्रवासाची दखल घेऊन लेखक व कवी म्हणून सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
जि.प.केंद्रशाळा,रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मा.पांडुरंग घोलप यांना शाळेचे माजी विद्यार्थी या नात्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री.भास्कर कोकतरे व सहशिक्षक श्री.गणपत डोंगरे आणि श्री.पंकज घोलप,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी आमंत्रित केले होते.
याप्रसंगी कविवर्य पांडुरंग घोलप यांचा रोहोकडी गावचे सरपंच मा.सुभाष घोलप व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफळ,सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विविध क्षेत्रातील काही सत्कारार्थीचाही सत्कार करण्यात आला.
‘मराठीचे शिलेदार’ समूह प्रकाशन संस्था नागपूर यांच्याद्वारे पांडुरंग घोलप यांचा “शब्दफुले” हा पहिला काव्यसंग्रह मराठी राजभाषा दिनानिमित्त बुलढाणा येथील कविसंमेलनात प्रकाशित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचे कवायत प्रात्यक्षिक व विविध गुणवर्णन कार्यक्रम, भाषणे याप्रसंगी सादर करण्यात आली. यानिमित्त गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, ग्रामसेवक, तलाठी,अंगणवाडी कार्यकर्त्या व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



