Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

आगरी समाज संस्थेचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन उपक्रम

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

आगरी समाज संस्थेचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा मार्गदर्शन उपक्रम

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग ( दि २): शहरातील आगरी समाज संस्थेतर्फे दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी चिखली हायस्कूल, कुर्डूस हायस्कूल व कुसुंबळे हायस्कूल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आगरी समाज संस्थेचे शैक्षणिक उपक्रम प्रमुख व मार्गदर्शक प्रो. मिलिंद धोदरे सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील ताणतणाव कसा कमी करावा, परीक्षेपूर्वी अभ्यासाची योग्य आखणी कशी करावी, आत्मविश्वास वाढवण्याचे मार्ग तसेच उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी ध्यान (मेडिटेशन) कसे करावे याबाबत सविस्तर, सोप्या व प्रेरणादायी पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन व आत्मविश्वास निर्माण झाल्याचे स्पष्टपणे जाणवत होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून आगरी समाज संस्थेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपली सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपयुक्त असे परीक्षा किट वितरित करण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी क्लब अलिबागचे अध्यक्ष श्री अंकुश पाटील, आगरी समाज संस्थेचे सचिव श्री प्रभाकर ठाकूर तसेच कु. श्रेयस ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

शैक्षणिक क्षेत्रात समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा आगरी समाज संस्थेचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिशादर्शक ठरणारा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अशाच प्रकारचे परीक्षा व शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम पुढील काळात तालुक्यातील ग्रामीण भागातील इतर शाळांमध्येही राबविण्यात येणार असल्याचे संस्थेने जाहीर केले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षात करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य विकास यांसारखे उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मनोदय आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष श्री निलेश पाटील व कार्यकारी मंडळाने व्यक्त केला आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे