
0
6
1
1
8
5
गुरु दीपस्तंभ
घनघोर तिमिरात पाऊले थबकती
गुरु दीपस्तंभ बनूनी दाखविती वाट
चुकलेल्या पावलांना योग्य दिशा देती
पार करती जीवनाचा कठीण हा घाट
गुरु ज्ञानसविता देती ज्ञान अपार
नीतिमूल्ये शिकवती करूनी संस्कार
मायेची सावली बनूनी संकटी देती धीर
निराधार शिष्यांचा ते बनती आधार
शिकवती सदा हो जीवनाचे गणित
आत्मविश्वासाचे मनी पेरती हो बीज
संघर्षाशी झुंजण्याचे देती मनी बळ
निराशेच्या क्षणी आशेचा किरण तेज
गुरुंचे ऋण असेची हो अपरिमित
मनी तेवती ठेवतात तेच आत्मज्योत
असंख्य शिष्यांचे घडविती ते जीवन
दीपस्तंभ होऊनी दाविती प्रकाशवाट
गुरुजनांचा हो सारे करुया सन्मान
ज्ञानदानाचे स्वीकारले असिधाराव्रत
वादळांना थोपवून नाव करिती पार
गुरुंच्या पदी करुया मस्तकची हे नत
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
0
6
1
1
8
5



