बळवंत मी , यशवंत मी’ हे पुस्तक जरुर वाचावे; अँड. जे. टी. पाटील
तुषार थळे प्रतिनिधी

‘बळवंत मी , यशवंत मी’ हे पुस्तक जरुर वाचावे; अँड. जे. टी. पाटील
जनसेवा नागरी सहकारी पतसंस्थेचे ज्येष्ठ सदस्य बळवंत वालेकर सर यांचे सामाजिक काम फार मोठे आहे. त्यांनी लेखणीच्या फटका-याने जिल्हा कामगार न्यायालय , जिल्हा दूरसंचार कार्यालय , जिल्हा पासपोर्ट कार्यालय जिल्ह्यात सुरू करण्यात यश मिळविले .
शासनाशी झगडून सागरगड – माची या आदिवासी वाडीस १० एकर जमीन मिळवून दिल्यामुळे या वाडीस रस्ता , वीज , पाणी इ. सुविधा मिळाल्या आहेत . शिवाय ते उत्तम लेखक व ज्येष्ठ पत्रकार आहेत . ‘बळवंत मी यशवंत मी’ या पुस्तकामार्फत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा आरसा सर्वांपुढे ठेवला आहे. पुस्तकाची मांडणी व छपाई सुंदर असून मुखप्रुष्ठही आकर्षक आहे. वर्णन वास्तववादी आहे. त्याबाबत त्यांचे मी विशेष अभिनंदन करीत असून सदस्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे आवाहन मी करीत आहे.असे प्रतिपादन जनसेवा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अँड. जे. टी. पाटील यांनी केले.
सदर पतसंस्थेची २७वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँरिष्टर अंतुले भवन अलिबाग येथे झाली . त्या सभेत अध्यक्षस्थानावरून अँड. पाटील बो लत होते . सदर सभेत उपाध्यक्ष मुश्ताक घट्टे यांनी पतसंथेच्या प्रगतीचा आढावा घेतला. व्यवस्थापिका सौ. अम्रुता पारसनीस यांनी अहवाल वाचन केले. या सभेस श्रीकांत जावळे , अनंत भिडे , श्रीकांत पाटील , राजेंद्र केतकर , सूर्यकांत सरोदे , सौ. सुरेखा जे. पाटील , सौ, अनघा भिडे सौ. कमलावती केतकर हे संचालक तसेच बहुसंख्य सदस्य उपस्थित होते .





