
0
4
8
2
8
4
सल
काट्याचा सानिध्यात
बहरणाऱ्या फुलां
काय तुझा विकास
होत आहे संपूर्ण?
गतकाळात जर पाहत
असशील डोकावून
तर वाटते का तुला
काहीतरी आहे अपूर्ण
तुझे स्वप्न ,आशा, आकांक्षा,
स्वतंत्र व्यक्तीत्व, स्वयंपूर्णता
काहीतरी वाटते का?
की झाल्या आहेत पूर्ण
तू पिंजऱ्यातला पक्षी ज्याला
सोनेरी पिंजऱ्याचा होता मोह
नशीबी गुलामीचा शिक्का
वाटते फोडत असशील आता टाहो
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर
0
4
8
2
8
4



