
0
6
3
9
6
0
प्रकाशपर्व
प्रकाशपर्व होतेय सुरू, घराघरात मनामनात
जळो सारे नैराश्यतम, चैतन्य भरो कणाकणात.
अंगण ते परसदारात, जेथे तेथे उजळली वात
जणू धरतीवर अवतरली, आज पौर्णिमेची रात..
जावो सारी इडा पिडा, येवो सुख,शांती,समृद्धी
हर जीवात प्रेमभावना, होवो आयुरारोग्य वृद्धी..
आभाळमाया भरभरून, बरकत शेत शिवारास
सुखी होवो बळीराजा, घरादारा करावी आरास..
लयास जावो कटूता, हर नात्यात येवो गोडवा
गृहलक्ष्मीस मान सन्मान, दररोज असो पाडवा..
भर भक्कम राहो इथे, प्रत्येक भगिनींचे माहेर
हक्काच्या आधाराचा, बंधूने द्यावा प्रेम आहेर..
दिपांची ही दिपावली, कुणी ना राहो हिन दीन
मानव्याची होवो पूजा, असा उजाडो हर सुदिन..
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========
0
6
3
9
6
0



