ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनमराठवाडासाहित्यगंध
वाल्याचा वाल्मिकी झाला
राजश्री मिसाळ ढाकणे ता. जिल्हा बीड

0
6
3
9
6
2
वाल्याचा वाल्मिकी झाला
वाल्या कोळी होता रानात
वाटेत तो करायचा लूटमार
कुटुंबासाठी पाप दररोज
घेतले निष्पाप जीव फार…!!
एकदा तेथे नारदमुनी आले
वाल्या त्यांना अडवू लागला
मुनी म्हणाले थोडे थांब तू
कुणासाठी पाप सांग मला..??
कोणी नाही पापाचे वाटेकरी
वाल्या नारदाचे पाय धरी
अनंत वर्षे तपश्चर्या वाल्याची
मुंग्यांचे वारूळ केले अंगावरी..!!
आदिकवी म्हणून गौरविले
रामायण महाकाव्य लिहिले
रामनामात आहे ताकद
जगाला राममार्ग दाविले..!!
वाईट मार्ग सोडून द्यावा
सत्कर्माचा ध्यास धरावा
एकचित्ताने राम म्हणावा
मानव जन्म सार्थ करावा..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
=========
0
6
3
9
6
2



