
0
4
8
2
8
6
सावित्री पोवाडा
तारीख जानेवारी तीन,
अठराशे एकतीस सन
नायगाव झालं पावन,
नेवासे पाटील पुण्यवान
जन्मा आले कन्यारत्न,
नाव ठेविले सावित्री… होऽऽ जीऽ जीऽ…
ज्योतिबाने तिला शिकविले
जीवन उजळले,
शिक्षिका बनविले
तळपली क्रांतिज्योती सावित्री फुले
झाली प्रज्वलित दिव्य ज्योती… होऽऽ जीऽ जीऽ
टवाळक्या करी बंडखोर
नाही मानली तिने हार
झेलीले शेणा-दगडांचे हार
स्त्री-शिक्षणाचा केला निर्धार…… होऽऽ जीऽ जीऽ
एवढ्यावरच ती थांबली नाही
बालविवाह प्रतिबंध घालून
विधवांचा पुनर्विवाह लावून
‘यशवंत’ दत्तक घेऊन
दिला आदर्श घालून
केले दीन-दलितांचे कल्याण… होऽऽ जीऽ जीऽ
जनसेवा हाच खरा धर्म
श्रेष्ठ नाही दुसरे कर्म
परपीडा दूर करण्यास
अर्पिले तिने स्वतःस
कोटी कोटी प्रणाम क्रांतिज्योतीस होऽऽ जीऽ जी
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड जि. नागपूर
0
4
8
2
8
6



