0
4
8
2
9
7
बालआनंद मेळा
उद्या आहे आपला बालआनंद मेळा
ठिकाण आहे ना लक्षात, गाढवेवाडी शाळा ॥1||
जमवून आणा साऱ्या बालगोपाळा
या दिनाचा तर असतो, मुलांना लळा ||2||
महत्वाचं म्हणजे कार्यक्रमाची,वेळ सर्वांनी पाळा
नाहीतर होईल, सगळाच घोटाळा ॥3||
हर्षोल्हासात या, भरवू आनंद मेळा
विद्यार्थ्यांना सांगा; हसा, खेळा पण शिस्त पाळा ||4||
सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळा
अन् जरा पाण्याचा, अतिवापर टाळा ||5||
भासली थोडी उणीव तरी,लहान समजून सांभाळा
उत्साहाने साजरा करू,बाल आनंद मेळा! ||6||
शारदा राहुल शिंदे
ता. वाई, जि. सातारा
===========
0
4
8
2
9
7



