0
4
8
2
9
0
शिदोरी
माय माझी तीर्थरुप
दिला धडा संस्काराचा
आहे सदा डोईवर
हात तिच्या शिदोरीचा
दोन घास अन्नासाठी
देह राबला शिवारी
पायी टोचताच काटे
सडा रक्ताचा भूवरी
माया लावणारी माय
क्रोध तिचा चुकांवर
क्षमा मागता तिची मी
अश्रू होती अनावर
काय वर्णावी महती
तिच्या दृष्ट्या थोरवीची
चित्ती आजही स्मरते
मूर्ती ती सोज्वळतेची
पाय तिचे वंदनीय
नित्य पुज्यनीय मला
फुले कष्टाची वाहतो
माझा दंडवत तुला
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड
0
4
8
2
9
0



