चाळीशीतील तारूण्यप्रेम
वसुधा वैभव नाईक धनकवडी, जिल्हा पुणे
चाळीशीतील तारूण्यप्रेम
प्रेम, प्रेम 19 आणि 20 वर्षातलं. मला ठाऊकच नाही की बाई. अगं माझं लग्न अठरा सुरू होताच झालं. 19 व्या वर्षी जुळ्या मुली झाल्या. विसाव्या वर्षी पूर्ण जबाबदारी पडली घराची. काय करते 19,20 वयात प्रेम. प्रेम करायच्या वयात लग्न झालं. नवऱ्यावरच प्रेम जडलं. जे आहे ते आपलं मानलं. आज लग्नाला 41 वर्ष चालू आहे. चाळीशीतील प्रेम म्हणाव, तर घरात अनेक जबाबदाऱ्याने जखडून ठेवलं होतं. डोकं वर काढायला वेळच नव्हता. मुलींची लग्न मुलाचे शिक्षण. पतीची तब्येत. सार सार पाहता प्रेम करायचं राहून गेलं. आता जरा मी माझ्यासाठी खरंच वेळ द्यायला लागले. माझ राहणीमान पहिल्यापासून असंच आहे. सर्व मॅचिंग लागते. अजूनही साडी खरेदी केली की त्यावर पहिल्या मॅचिंग बांगड्या मी आणणारच. मॅचिंग शिवाय घालणं मला जमत नाही. किमान नऊ बांगड्या तरी माझ्या एका हातात हव्यात. पण जर आता मी लुक चेंज केलाय माझा. कधी ब्रेसलेट वापरते, कधी एकच कडा घालते, तर कधी हातभर बांगड्या घालते.
प्रेम, प्रेम म्हणायचे तर काय सांगावे तुला? लय जण प्रेम करतात माझ्यावर, पण मी नाही करू शकत नाही त्यांच्यावर.. असो… हा एक ‘जोक ऑफ द पार्ट’ झाला. मुलींचे लग्न झाले मुलाचं लग्न झालं, पाच नातवंड आहेत मोठी छान. काय करते प्रेम सांग बरं! या माझ्या सर्व माणसांवर प्रेम करणे हेच माझे जीवन झाले आता. आणि सामाजिक बांधिलकी! मी स्वतः मला बांधून घेतले. समाजातील वंचित मुलांवर प्रेम करणं, त्यांना जास्त वेळ देणे,त्यांची गरज आहे ते पूर्ण करणं, वृद्धांना अन्नधान्य पुरवणं. बालांना कपडा लता पुरवणं. सामाजिक बांधिलकीतून हे मी जोपासत आहे.
यातून समाजात नाव होते, महाराष्ट्रात नाव होतंय. आज गुगल सर्च केलं की, माझी माहिती येते. आनंदाचे प्रेम सर्वांचे मिळवते. सुखदुःखाच्या ह्या जीवनातून जीवनक्रमण जगत आहे. सुखाची ओंजळ भरून घ्यायची. दुःखाची ओंजळ भरायचीच नाही. कार्य करत राहायचं आनंदाने कार्य करायचं. आनंदमय जीवन इतरांना जगायला शिकवायचं.
अशी ही वसुधा, वेडी वसुधा म्हणा! आहे तुमची! सर्वांवर खूप प्रेम करणारी. सर्वांना माया लावणारी. प्रेम काय देणारे भरपूर आहेत. ते तेवढ्यापुरतं असतं. 40 चे प्रेम परिपक्व असतं. 40 त प्रेम होऊ शकते. भावनांवर कंट्रोल हवा. साठीच्या दरम्यानचे प्रेम सुद्धा महत्त्वाचे बर का!” सर्व जबाबदाऱ्या संपलेल्या असतात. जेवढा आपल्या मनात जगून घ्यायचं राहिला आहे ते जगून घ्यावसं वाटतं. पुढचे क्षण कोणी पाहिलेत हो! अचानक झाला एक्सीडेंट तर जावू वर, आला हार्ट अटॅक जावू वर, काय या जीवनाचे खरे आहे का हो! मिळाले जीवन घेऊया आनंद.
“आनंद या जीवनाचा, सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सुर जैसा, ओठातुनी ओघळावा.”
वसुधा वैभव नाईक
धनकवडी, जिल्हा पुणे
========



