सिर्सी येथे अवैध्य दारू विक्रेत्यांवर धाड; ओपन बार म्हणजे दारूचा अड्डा
अखिल रोडे, प्रतिनिधी
सिर्सी येथे अवैध्य दारू विक्रेत्यांवर धाड; ओपन बार म्हणजे दारूचा अड्डा
कच्चा-चिवडा टपरीच्या नावावर चालतो अवैध्य दारू विक्री व्यवसाय
अखिल रोडे, प्रतिनिधी
उमरेड/ सिर्सी:- मद्यपींसाठी बहुचर्चित असलेले सिर्सी हे गाव हिंगणघाट – उमरेड मार्गावरील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे व वर्धा जिल्ह्याची सीमा असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातून सिर्सी येणाऱ्या बेवड्यांची गावात सकाळ -सायंकाळी अंगत- पंगत व रंगत असते. ठीगभर दारू दुकाने असल्यामुळे सिर्सी गावात बेवड्यांचा धांगडो असते. शासकीय देशी दारू दुकानच्या परीसरात रोडवर अतिक्रमण जागेवर चकण्याची दुकानाच्या आडून अवैध्य दारू विक्री केली जाते. शासकीय दुकान उघडाच्या आधी बेवड्यांचा चकणा – चिवडा दुकानात दारू पिण्यासाठी भरगच्च गर्दी असते. शासकीय दारू दुकान बंद ( ड्राय डे ) असला की चिवडा दुकान आणि रोड वर बेवड्यांचा मेला असतो.
सिर्सी चौकीचे पोलिस हवालदार श्री कुणाल ठाकूर गस्तीवर असतांना चिवडा दुकानाच्या आड मध्ये अवैध दारू विक्रेता विजय पत्त्रुजी जांभुळे रा. सिर्सी हा दारू विकताना दिसताच धाड टाकून 10 बॉटल देशी दारू जप्त करून महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65(ई) [दुरुस्तीनंतर] अंतर्गत कार्यवाही करण्यात आली.
शासकीय देशी दारू बंद ( ड्राय डे ) दिवशी असतो बेवड्यांचा मेला
शासकीय देसी दारू बंद असते तेव्हा रोड वर असलेल्या अतिक्रमण चिवडा – चकणा दुकानात अवैध दारू विक्री जोरात सुरू असते. चकणा दुकानात बेवडे टल्ली होऊन गावात धांगडो घालतात प्रसंगी राजकीय नेते, ग्रामपंचायत सद्यस , पत्रकार यांच्याशी झगडे भांडणास तयार होतात. पोळ्याच्या बोजारा द्या अस बोलून बेवडे कुणाच्या पण घरी जाऊन बोजरा मांगतात. गावकरी अश्या बेवड्या मुळे त्रस्त झाले आहे. काही दिवसा अगोदर सिर्सी. गावात बँकेतून निघालेल्या एका बावाजीची पैसेची बॅग लंपास केली होती ते दोन्ही आरोपी ची प्लानिग अश्याच चिवडा – चकणा दुकानातून झाली असे बोलले जाते.
बेला पोलिस स्टेशनला मिळाले नविन ठाणेदार
बेला पोलिस स्टेशन येथून ठाणेदार श्री अजित कदम यांची बदली झाल्यानंतर बेला पोलिस स्टेशनचा कारभार प्रभारी ठाणेदार श्री लभाने साहेब यांच्याकडे होती. बेला पोलिस स्टेशन येथे जलालखेला येथून दबंग पोलिस ठाणेदार श्री चेतनसिंह चौहान यांचे आगमन होतात अवैध दारू विक्रेते यांचे धाबे दणानून असल्याची चर्चा सुरू आहे.



