0
4
8
2
9
7
नारीशक्ती
अनंत अपार नारीशक्ती
शक्तीरुपिणी तेजधार
फुलांपरी ती कुसुम कोमला
वज्रापरी कधी कठीण फार
रणरागिणी, मायभवानी
शिवाची तीच अर्धांगिनी
शौर्यासह प्रेम नांदते
तू सुंदरा,गे ओजस्विनी
माय माऊली झरा मायेचा
अर्धांगिनी आधार पतीचा
कन्या ही तर तुळस अंगणी
ओघ वाहता ही ममतेचा
जोखड पायीचे तिने तोडले
ज्ञानाचे कवडसे शोधले
झेप क्षितीजापार घेऊनी
संकटांचे पहाड भेदले
म्हणती सारे तिला अबला
नभातली ती चपल चपला
भोग्य मानती जे नारीला
तया दंडिते हीच तेजला
वृंदा(चित्रा)करमरकर
जिल्हा सांगली
0
4
8
2
9
7



