0
4
8
2
9
0
प्रेमाचं आॕडीट
दिलंय मी तुला सर्वस्व
हृदयाच्या जुळताच तारा
गाजवतेस तूच वर्चस्व
तू रानफूल मी गं रानवारा
गोंजारून तुझ्या कुंतलांना
सर्वांगाला तुझ्या गं स्पर्शतो
चुंबतांना तुझ्या गं गालांना
मनोमनी मीच किती हर्षतो
आपल्या गं प्रेमाचं आॕडीट
नाही गं विद्यापीठ करणारे
चालतात माझे गं हार्टबीट
जखमांनी नाही गं हरणारे
निरपेक्ष प्रेमाला ही दुनिया
कधी समजून नाही घेणार
खिपल्या काढून गं लिलया
मीठ जखमेवर गं चोळणार
दुनियादारीच्या चक्रव्यूहात
नाही आपण गं अडकायचं
तेवत ठेवू हृदयात प्रेमवात
नाही वावटळींनी भडकायचं
सरड्यावाणी रंग बदलणारी
करतील गं या प्रेमाचं आॕडीट
प्रेमावर आपल्याच जळणारी
दैनंदिनीतूनच करू गं डिलीट
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
=========
0
4
8
2
9
0



