Breaking
आरोग्य व शिक्षणचारोळीविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 7

*????संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट तेरा????????????*

*????️विषय : नात्याची गुंत????️*
*????गुरूवार : ०७ / ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*नात्याची गुंत*

अगम्य ही नात्याची गुंत,
मनी रुतलेली अबोल खंत,
ऐकले तर सोडवली जाते,
बोलले तर गुंतली जाते//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

गैरसमजेच्या शत्रू मुळे
नात्याची गुंत सुटते
एकमेकांचे विचार पटले
तरच नातं टिकते

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*चित्र चारोळी – नात्याची गुंत*

टोकाचे मतभेद सोडून
सुसंवाद घडावा नित्य
नात्याची गुंत वाढविते
माझेच आहे फक्त सत्य

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

का रे अबोला, का रे दुरावा?
चूकही तुझी,न्यायही तुझा
नात्याची गुंत तुटते अशाने
जीव उलघाल होतोय माझा…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा- पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*नात्यांची गुंत*

अगम्य नात्यांची गुंत
सुटता सुटत नाही
माघार कोण घेणार
अहंकार जात नाही.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

देवा-ब्राह्मणासाक्षी सप्तपदीत
तुझे-माझे गुंफले नातं
मीपणा नडला स्वभावात
क्षणात तुटली नात्याची गुंत

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

आई समोर आल्यावर कधी
नात्याची गुंत नाही राहायची,
कारण नात्याची सर्व माणसे
आईच्या हो लक्षात राहायची.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

नात्याची गुंत तुझ्या माझ्या प्रीतीची
ओळख आहे सासर माहेरची
समाजात आपलेपणाने राहण्याची
दोन्ही घराण्यांच्या प्रतिष्ठेची

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

नात्याची गुंत विचित्र
कशी ठेवावी माळून
जीवमोलाने जपले तरी
हवे तेच पडते गळून…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

आयुष्याच्या प्रवासात
प्रेमळ लोभस रुसवे फुगवे
विणतो कधी नात्याची गुंत
वैमनस्याची नको मुळीच भिंत

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

नात्याची गुंत जोडून
साजरे करून पर्व ,
एकत्र येऊन सर्व
मनोमनी आनंदून .

*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

सगेसोयरे येतात कामात
त्यांना कळून चुकतात नाते
हीच नात्याची गुंत पुढे
संकटकाळी धावून येत असते

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️
*नात्याची गुंत*

झाले गेले विसरून जावू
नात्याची गुंत प्रेमाने सोडवू
ऋणानुबंध जपण्यासाठी
अनमोल नाते टिकवून ठेवू

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????❤️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे