0
4
0
9
0
3
साखरपेरणी
मुखातून शब्दांची
व्हावी साखरपेरणी
नम्र,मुलायम,रेशमी
असावी अपुली बोलणी
मधमिश्रीत वाणीने
जुळते मन मनाशी
निर्माण होती नाते
ऋणानुबंधाच्या राशी
वाढत जातो गोतावळा
प्रेमळ शब्दांच्या पिकानी
प्रेम द्या,प्रेम घ्या सात्विक
नको कपटभाव अंतर्मनी
वृद्ध मातापित्यांवर करा
सेवा निर्व्याज मायेनी
फळेल,फुलेल जीवन हे
छाया राहील आशीर्वादानी
अंतरी एक,बाहेर एक
नको नीती दोलायमान
हृदयातुन उठता प्रेमलहरी
उंचावेल तेजाने जीवनमान
राग,द्वेष,मत्सरानी
नको कुणाशी वागणे
साखरपेरणी अंतरातून
फळ तयाचे चाखणे
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
0
4
0
9
0
3





