Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखबीडमराठवाडासंपादकीयसाहित्यगंध

सर्वांना आवडणारी..’वाघाची मावशी’; शर्मिला देशमुख घुमरे

बालकाव्य परीक्षण

0 4 8 2 9 0

सर्वांना आवडणारी..’वाघाची मावशी’; शर्मिला देशमुख घुमरे

‘वाघाची मावशी भलतीच हौशी,
उंदीर तळून खाते एकादशीच्या दिवशी’

अशी ही ‘वाघाची मावशी’ आपल्या घरात ,परिसरात बिनधास्तपणे वावरणारी आणि आपल्या बसण्याच्या झोपण्याच्या ,ओरडण्याच्या विविध कलांनी सर्वांना आकृष्ट करणारी. अहो, वाघाची मावशी म्हणजे कोण काय विचारताय? वाघाची मावशी म्हणजे मांजर हो .आता तिला वाघाची मावशी का म्हणत असतील बरं? तर हा मांजर नावाचा प्राणी हा अत्यंत नीडर, बहादूर आणि हिम्मतवाला असतो. तिचा आकार ,चालचलन ही वाघाप्रमाणेच असून त्यांचा वर्ग एक असतो. परंतु वाघापेक्षाही काही गुणांनी श्रेष्ठ असल्याकारणाने तिला ‘वाघाची मावशी’ म्हणतात.

आता ही ‘वाघाची मावशी’ खूप चोरटी आणि लबाड पण असते बरं का. पण तरीही तिच्या विविध कलांनी ती मोहवून घेते. 280 हाडे असणारी मांजर आपल्या तीनपट उंचीवरून उडी मारून सुरक्षित अवस्थेत जमिनीवर येते. हे प्राणी जन्मतःच भांडखोर वृत्तीचे असतात. दिसायला गोंडस असणारा हा प्राणी विश्वास योग्य नसतो पण तरीही तो मोठ्या प्रमाणावर पाळला जातो. हा मांजर नावाचा प्राणी मनुष्याच्या कुंडलीमध्ये पण असतो मार्जार या नावाने. या वर्गाच्या लोकांचे गुण जास्त मांजराप्रमाणे असतात, असे कुंडली सांगते. उंदराच्या प्रतिबंधासाठी आणि आवड म्हणून हा प्राणी मोठ्या प्रमाणावर पाळला जातो. या मांजरीचे शरीर इतर प्रजातीप्रमाणेच असते. मजबूत , लवचिक शरीर ,द्रुत प्रतिक्षेप, तीक्ष्ण दात आणि मागे घेतलेले लहान पंजे शिकार करण्यासाठी अनुकूल आहेत. रात्रीची दृष्टी आणि गंध घेण्याची क्षमता जबरदस्त असते. मांजर हा सामाजिक प्राणी असला तरी शिकार एकटाच करतो. तिला प्रामुख्याने उंदीर खायला आवडतो तसेच तिचे दूधही जीव की प्राण.

परिसरामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या मांजरी पाहायला मिळतात. रान मांजर हा प्रकार पण रानामध्ये आढळतो.रानमांजर आकाराने मोठे असते. वेगवेगळ्या देशात ,राज्यात वेगवेगळे मांजराचे प्रकार आढळतात. तिचा विशेष गुण म्हणजे मांजर कुठेही डोळे बंद करून जरी सोडली तरी ती घरी येते इतके तिचे दिशा ज्ञान असते. एकंदरीतच हा हुशार, धूर्त ,शिकारी असणारा प्राणी मानवाला मात्र खूप खूप आवडतो. आता म्हणाल हे “मार्जार” पुराण कशासाठी ?अहो ,मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेचा विषय नाही का राहुल दादांनी ‘वाघाची मावशी असा दिला .लहान मुलांना आकृष्ट करणारी वाघाची मावशी’ आमच्या बाल मनाच्या शिलेदारांना पण आकृष्ट करून गेली की. आणि शिलेदारांनी भरभरून वाघाच्या मावशी वर लिहिले. वाघाच्या मावशी बरोबर खेळण्याची मजा सर्व शिलेदारांनी घेतली. तिच्याबरोबर मस्ती करत करत जंगलाची ही सवारी करून आले.

राहुल दादांनी मला परीक्षण लिहिण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी धन्यवाद . सर्व शिलेदारांना बालकाव्य लेखणीसाठी भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. आणि हो, ही ‘वाघाची मावशी’ लवकरच आपल्या भेटीला येत आहे.

शर्मिला देशमुख -घुमरे बीड
मुख्य परीक्षक,सहप्रशासक,कवयित्री
मराठीचे शिलेदार समूह

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे