0
4
8
2
8
6
अमरत्व
सारेच जाणून आहेत
जीवनाचे क्षणभंगूरत्व
तरी प्राप्त होवू शकते
इथे सत्कर्माने अमरत्व.. //
अमर होण्यास जगात
हवे कशाला दिर्घायुष्यं
उरते नाव स्वकर्तृत्वाने
ठरते पुरेसे अल्पायुष्यं… //
ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहूनी
ज्ञानदेवे केली किमया
आठराव्या वर्षी समाधी
अचंबित झाली दुनिया.. //
राणा शिवा राजे झाले
समरभूमी जीवन बनले
जोवर सूर्य, चंद्र,सितारे
तोवर नाव अमर केले.. //
नश्वर देहाची होई माती
ईश्वर साक्ष व्हावी किर्ती
मरून जगावे कर्म रूपी
ज्याने त्याने घ्यावी स्फूर्ती.. //
विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
========
0
4
8
2
8
6



