तीनविरा “रास्तारोको” यशस्वी
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

तीनविरा “रास्तारोको” यशस्वी
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: शहरातील अलिबाग -वडखळ राष्ट्रीय महामार्गावर असलेला “तिनविरा” थांबा एस्. टी. महामंडळाने जलद गाड्याँसाठीही मंजूर केला आहे. पण तेथे जलद गाड्या थांबत नसत. तसेच M.I. D. C.च्या पेझारी – जळपाडा मार्गावर धावणा-या गाड्याही एस्. टी. महामःडळाने बंद केल्या होत्या. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांची गैरसोय होत होती .
हा अन्याय दूर होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्था कामार्ले विभाग वाघोलीने ज्येष्ठ पत्रकार ‘बळवंत वालेकर’ यांच्या नेत्रुत्वाखाली “तीनविरा” येथे रास्तारोको जाहीर केला.व तसे जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक व एस्. टी. चे विभागीय नियंत्रक यांना कळविले. त्यामुळे जिल्हा प्रशासन जागे झाले.
निवडणूक आचार -संहितेच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोयनाडचे पोलिस सहा. निरीक्षक यांनी “रास्तारोको” टाळण्यासाठी संबंधितांच्या बैठका वाघोली व पोयनाड पोलिस ठाणे येथे घेतल्या. तण पोयनाड पोलिस ठाणे येथील बैठकीत “तीनविरा” थांब्यावर ट्रँफिक इन्स्पेक्टर नेमला जाईल तसेच M. I, D, C, मार्गावर जादा दोन एस्. टी. गाड्या दिल्या जातील” असे एस्. टी. चे विभागीय नियंत्रक यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे ” सदर ‘रास्तारोको’ स्थगित केल्याचे पत्रकार बळवंत वालेकर यांनी जाहीर केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष दामोदर ठाकूर , कार्यकारिणी सदस्य प्रकाश जोमा पाटील व चंंद्रकांत वालेकर तसेच खिडकीचे माजी सरपंच वैभव पाटील उपस्थित होते .
नंतर विभागीय नियंत्रक रा. प, रायगड विभाग पेण यांनी क्र. / राप रायगड / वाह / चालन / ५-२ /५०९ दि. ३० / १० /२४ च्या पत्रानुसार रेवस – M.I,D, C मार्गे . पोयनाड व पोयनाड – M, I. D. C, मार्गे अलिबाग या दोन गाड्या सुरू केल्या जात आहेत ,असे ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना कळविले आहे. या शुभ वार्तेमुळे प्रवाश्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.



