
0
4
0
8
9
0
केरकचरा
बाईंनी स्वच्छतेचे महत्त्व
साऱ्या मुलांना पटवून दिले
पटांगण व वर्ग रोज स्वच्छ
करायच असे त्यांना सांगितले
केरकचरा कुजला तर
वातावरण दुषित होईल
रोगराई पसरेल सर्वत्र
आरोग्य आपले बिघडेल
स्वच्छता अभियान आमच्या
शाळेत राबवण्यात आले
सुका,ओला कचरा याप्रमाणे
अलग अलग करण्यात आले
गोळा करून सारा केरकचरा
कचरा पेटीतच टाकायच ठरले
आनंदाने साऱ्या मुलांनी कचरा
उचलून पटांगण स्वच्छ केले
मुलांनाही स्वच्छतेचे महत्त्व
पटले घर असो की शाळा
केरकचरा वेळीच काढायच
फुलवायच स्वच्छतेचा मळा
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
4
0
8
9
0





