ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
बाप कधी कळणार नाही
पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी, जुन्नर, पुणे

0
4
0
8
9
0
बाप कधी कळणार नाही
स्वतः बाप झाल्याशिवाय
बाप कधी कळणार नाही
लेकरासाठी अंगाईचेही
सूर कधी जुळणार नाही
स्मरतील कष्ट बापाचे
जागतील साऱ्या आठवणी
त्याने खाल्लेल्या खस्ताना
न्याय कुठेच मिळणार नाही
बोट धरून चाललो ज्याचे
ते सुरकुत्या पडलेले हात
येतील डोळ्यासमोर आज
वेदना मात्र छळणार नाही
पहिली स्वप्ने भविष्याची
वरदान सोनेरी यशाचे
त्यागली सुखाची झोप
देहाला या कळणार नाही
बाप नावाचे काळीज असे
आभाळ पांघरून घेताना
काळजीच्या संथ जाणिवा
डोळ्यातून ओघळणार नाही
पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी, जुन्नर, पुणे
========
0
4
0
8
9
0





