0
4
8
2
9
0
माणूस
माणूस आसून माणूस हा
माणसासारखा वाटेना
माणसाचेच माणसासोबत
हल्ली थोडे सुद्धा पटेना
केवढा व्यस्त झाला माणूस
कोणीच कुणाला भेटेना
कधी भेटलाच कोणी कोनास
खुशाली विचारावीशी वाटेना
फुगून तर…. सारं घर
मुखी शब्द कुणाच्या फुटेना
एकमेकांच्या मनातील आडी
ती काही केल्या सुटेना
एवढा कसा बदलला माणूस
त्याचं कोडं आजून सुटेना
पाव्हना घरी आला तरी
आता त्याला मानपाण भेटेना
किती निर्दयी झाला माणूस
त्याला पाझर काही फुटेना
तडफडून कोणी मेलं तरी
हातचा मोबाईल काही सुटेना
पूर्वीसारखे प्रेम जिव्हाळा
हल्ली आता कुठेच भेटेना
कडकडून मिठी मारत
आता कोणी कोणाला भेटेना
प्रकाश पुंडलिक गोधने
बाचोटीकर ता.कंधार जि.नांदेड
0
4
8
2
9
0



