Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

आईचा शोध-बोध

नरेंद्र गंगाराम साबळे ता. गंगाखेड, जि. परभणी

0 5 1 7 5 8

आईचा शोध-बोध

शशी आई ग …शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही…
सकाळच्या गं पा-यामधी नेहळणा-या
डोळ्याला का…शिन आला बाई?
मला तुझ्या विन करमत नाही…!
रोजचा चहा …आज बेचव झाला कसा,
तुझ्या प्रेमाचा गोडावा कोणी वडाळला…!
शशी आई ग …शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही…
अंघोळीचं पाणी कोणी थंड केलं
तुझ्या स्पर्शानं पुन्हा गरमलं…
पानातलं वैभव दिसना मला
अन्नाचा घास जड झाला…
नेत्री अश्रूंचा गर्दा झाला
शशी आई ग शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही!
दिवसाचा सूर्य कधी मावळला
कधी तुझ्या काकणाचा स्वर मंदावला…
लुगड्याची उशी माझ्या ऊसेशी रुतली,
माडीची बला यईना कशाला!
तुझ्या कुशीची उब नको गोधढी चादरी
पावसात लपल पदरात,
त्याचा गोडवा नसे छत्रीत…
ऊन्हात घाम आला अंगा -अंगात
तुझ्या रेशमी पल्लवाचा स्पर्श किती नाजूक
शशी आई ग …शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही!
निवांतपणा नाही राहीला तनात,
तुझ्या पायी जीव कासावीस…
आता भेट कधी माहीत नाही
भेटीसाठी जीव घालमेल होई
शशी आई ग …शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही…!
थांबून ठेवले पारिजाता
नको फुलू काही क्षणा
शशी आई दिसता क्षणी
बरस तू मित्रा शेंडा बुडा…!
शशी आई ग …शशी आई
मला तुझ्या विन करमत नाही…!

नरेंद्र गंगाराम साबळे
ता. गंगाखेड, जि. परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे