
0
5
1
7
5
8
परतफेड
मायबाप विसरूनी,वागतात सर्वजण।
राग द्वेष अहंकार, माखले ईर्षेनी मन।।
दुःख लोका सांगायला,शब्दही कंठी थांबले।
पैशा अडक्यात सारे,माणसे जगी वाटले।।
प्रेम नातं भावनांना,ओळखत नाही कोणी।
मेल्यावर चाटतांना,पाहीले टाळूचे लोणी।
जगताना मिळेल का,त्या सर्वांना मधूमास।
क्षणोक्षणी झेलती , व्यथा वेदना मनास।।
देणा-याचे घेत जावे, परतफेड काय द्यावे।
पालापाचोळा नको तो, गंध फुलांचा अर्पावे।।
गोवर्धन तेलंग
ता.पांढरकवडा, जि. यवतमाळ
0
5
1
7
5
8



