
0
6
1
1
8
5
क्षणार्धात
क्षणार्धात होते उलथापालथ
चालता बोलता थांबतो रथ
अचूक निवडावा जीवनपथ
नाकात नको अज्ञानाची नथ
अज्ञानाचा अतिरेक क्षणार्धात
माणुसकीला लावेल काळीमा
हा जन्म नाही रे पुन्हा अर्थात
मानव जन्माची जाणा महिमा
क्षणार्धात नका बदलू तत्वांना
स्वार्थात रे त्या होऊन आंधळे
तरसत राहाल सुखद क्षणांना
धडधाकट असून व्हाल पांगळे
करता कशाला चिंता उद्याची ?
निसटून जाईल हातातली वेळ
भरवशाची ना स्थिती सध्याची
जीवनाचा होतो क्षणार्धात खेळ
अतिविचारही नसतो कामाचा
जीवन हे सुंदर,खुशाल रे जगा
आनंद लुटा कष्टाच्या दामाचा
जीवनात कुणाला न देता दगा
संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर
==========
0
6
1
1
8
5



