बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न
तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग
बिनधास्त न्यूज मिडीया
अलिबाग: रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दुपार सत्रात सर्व प्रथम कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी तथा हेड कॉन्स्टेबल रायगड पोलिस साजिया कप्तान यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विशाल पाटील सर व यतिश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
त्यानंतर विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी तथा हेड कॉन्स्टेबल रायगड पोलिस साजिया कप्तान, मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर व उपस्थित सर्वांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
मुख्याध्यापक प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून महिला दिन व नारीशक्ती विषयी माहिती सांगितली.
विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी तथा हेड कॉन्स्टेबल रायगड पोलिस साजिया कप्तान यांचे औक्षण करण्यात आले तसेच पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला.
यानंतर विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॅडम, दिव्या भगत मॅडम, प्रिती कवळे मॅडम, प्रियंका राणे मॅडम, शतदा राऊत मॅडम व शिक्षकेत्तर कर्मचारी मधुमती गायकर यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी अन्वी राणे [ इ. ६ वी ], सई कवळे [ इ. ७ वी ], ऋग्वेदी कोळी [ इ. ८ वी अ ] व रक्षिता म्हात्रे [ इ. ९ वी अ ] या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर दिव्या भगत मॅडम व आशिष राणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी तथा हेड कॉन्स्टेबल रायगड पोलिस साजिया कप्तान यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व केलेल्या सन्मानाबद्दल विद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पल्लवी पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंका राणे मॅडम यांनी केले.
सकाळ सत्रात महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये साजिरी म्हात्रे [ इ. ११ वी वाणिज्य ] व तपस्या वाघ [ इ. ११ वी कॉमर्स ] या विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कैलास शिकारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन दत्तात्रय अहिरे सर यांनी तर आभार प्रदर्शन नितिन शिंदे सर यांनी केले.



