Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरनांदेडमराठवाडामहाराष्ट्र

चौकी महाकाया शाळेच्या लेझीम नृत्याने केले मंत्रमुग्ध

७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

0 4 8 2 9 0

चौकी महाकाया शाळेच्या लेझीम नृत्याने केले मंत्रमुग्ध

७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

जिल्हा प्रतिनिधी, नांदेड

नांदेड: (दि २६ जानेवारी): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकी महाकाया शाळेच्या जिजाऊ लेझीम पथकाने गावकऱ्यासमोर विविध गीतावर आधारित लेझीम नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.

प्रभातफेरीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला.शाळेतील ध्वजारोहण झाल्यानंतर चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून विविधांगी विषयावर आपले विचार व्यक्त केले.तद्नंतर शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार लेझीम नृत्यावर लोकांकडून प्रेरणा म्हणून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. गावच्या पोलीस पाटील शिवनंदा सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून लेखन साहित्य वाटप केले.

यावेळी सरपंच वच्छलाबाई कदम, तंटामुक्ती अध्यक्ष राम राठोड,शा.व्य.समितीचे अध्यक्ष हणमंत कदम, सदस्य हौसाजी वडजे, प्रल्हाद पवार,इरवंता वाघमारे,उषाताई कदम, शाहूबाई कहाळेकर,कैलास कहाळेकर,धम्मा वाघमारे,गजानन बेळे, भीमराव सुर्यवंशी,सुनील वाघमारे,सुशीला बंडेवार,वंदना वाघमारे, प्रल्हाद पवार,मंगलबाई कदम,रेखाबाई कांबळे, राहुल वाघमारे,आनंदा सोनकांबळे, आशाताई वाघमारे,सुवर्णा सूर्यवंशी, उषा सूर्यवंशी यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,शाळेतील विद्यार्थ्यांचे आई वडील, शाळेतील माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सहशिक्षक श्री बळवंत डावकरे व आभार मुख्याध्यापक श्री बालाजी पाटील यांनी मांडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे