Breaking
कविताक्रिडा व मनोरंजननागपूरसाहित्यगंध

बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 6 2 9 0 4

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*🥀विषय : गावाकडची श्रीमंती🥀*
*🍂बुधवार : ०२/ सप्टेंबर /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गावाकडची श्रीमंती*

स्वर्ग नरक कशाचे ,माझे गाव बरे होते !
जिकडे तिकडे वाहे, अम्रुताचे झरे होते !!

पैनगंगा तीरावर, वसले एक छान गाव !
सुख दुःखात धावे ,सारे रंक आणि राव !!

साध्या भोळ्या माणसांची,लाभली ही वस्ती !
गौरवाने सांगतो मी ,गावाकडची श्रीमंती !!

विज टिव्ही नसताना ,सगळेच समाधानी !
घराघरात उजेड देई, कंदील शामदानी !!

लपंडाव अन् गील्ली -दांडूची ती वेळ !
आनंद मौज मस्ती, बालपणीचा खेळ !!

गावोगावी शिवारात ,फक्त होती पायवाट !
सुंदर भोवती दिसे, माळरान जंंगल दाट !!

कोंबड्यांची बाग ऐकून, निजलेले हे जागे !
ताजेतवाने होऊन, मग कामोकामी लागे !!

सुख दुःख वाटावया, गावात पिंपळ पार !
धडे मानवतेचे मिळे ,नि सावली थंडगार !!

साध्या माणसांची माझी,*मांगली* माऊली !
आम्हां चिला पिलांना ,वाट ज्ञानाची दावली!!

आज राहतोय महाली मी , दिवस तसे नाही !
मायबाप गणगोत विणा , हि फुकाची कमाई!!

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा.जि, यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

माझ्या गावच भूषण
बारा बलुतेदाराची वस्ती
नांदत होती गुण्यागोविंदान
कुणा नव्हती मस्ती….१

माणुसकीचा झरा
वहात असे ठाई
होती मनात आपुलकी
नव्हती कुठे मोगलाई…..२

पेटली नाही चूल ज्याची
तळमळ सर्वाना राही
एक तीळ राईचा
सर्व वाटून खाई….३

सण उत्सव,
जत्रा गावदारी,
नाही कुठे भेदभाव
दिसे माणुसकीची वारी…४

गावाकडची श्रीमंती
आज हरवली राव
सिमेंटच्या जंगलात
टिकेल का?माणसाचं नाव…..५

नात्याच्या भिंती
लागल्या कलु
पिढया नवतीच्या
लागल्या चळू ….६

आठवांचा हिंदोळा
आज वाऱ्यावर झुले
गावाकडची श्रीमंती,दुरावली
डोळे झाले ओले….७

*श्री पैठणकर सर,नाशिक*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गावाकडची श्रीमंती*

हिरवीगार आमराई
आंबे खाण्याची मजा
सुबत्ता सर्व गावाला
मनसोक्त लुटा मजा

येता दारी भिक्षुकरी
कोर कुटका मिळायचा
आशीर्वाद देत तो पुढे
आपला रस्ता धरायचा.

मिळून मिसळून राहायचे
गप्पा पिंपळाच्या पारावर
गावात कुठे काय घडलं
विचार व्हायचा त्यावर

कुणा घरचा कार्यक्रम
गाव समदे धाव घेई
अडीअडचणीला कधी
पैशाचीही मदत होई

लेक असो कुणाचीही
असे समद्या गावाची लेक
तिच्या संरक्षणाची हमी
विचार होते गावचे नेक

पाहुणा येवो कुणा घरी
आदरातिथ्य घरोघरी
गावाकडची श्रीमंती
दिसे ना शहरी कुठेतरी

वाटे पुन्हा मनाला
गाव माझे बरे होते
शुद्ध ताजी हवा अन
माणुसकीचे झरे होते

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

जरी नसेल पैसाआडका तेवढा
आहे सोन्यावानी काळी माती
पूरविते उभ्या जगा आणपाणी
अशी आहे गावाकडची श्रीमंती

माणुसकी नाते जपलेले दिसेल
असेल प्रत्येकाच्या अंत:करनात
उभ्या जगाचा पोशिंदा शेतकरी
हा राबराब राबतो उन्हातान्हात

शेतामधी पिकलं हिरवगार सोनं
जोपासले आहे कष्टाच्या घामानं
नसले अंगावर दागदागिने भले
शोभतंय शरीर घामाच्या धारांनं

होते गरमागरम भाकरी चुलीवर
कांदा,चटणी,ठेसा हा सोबतीला
पिझा बर्गर पेक्षा लागतोय भारी
आवडीने खातात सगळे त्याला

माणसे माणसाला ओळखतात
संकटकाळी एकमेका धावतात
सुखदुःखाचे सोबती एकमेकांचे
मिळून सारे समस्या सोडवतात

येता जाता रस्त्याने भेटीगाठीत
दोन गोष्टी आपुलकीने बोलतात
नातीगोती संबंध ते जिव्हाळ्याचे
जन्मोजन्मी ऋणानुबंध जपतात

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

कौलारू घर, अंगणात तुळस
क्षितिजावरती सोनेरी पहाट
गावाकडची श्रीमंती ही
मनाला देई जन्मभराची साथ

पाखरांच्या किलबिलाटात
पहाट हसते नव्या रंगात
झाडांच्या सावलीत विसावते
शांतता गावाच्या प्रत्येक वाटेत

घाम गाळून शेतकरी
हिरव सोन पिकवतो
मातीशी नातं जपणारा
गावच खरा श्रीमंत असतो

चुलीवरच्या गरम भाकरीचा
वास दरवळतो अंगणभर
चार घासांत वाटून घेतात
आपुलकीचे सुख मनभर

पैशाने मोजता येत नाही
नाती इथली अनमोल
गावाकडची हीच श्रीमंती
माणुसकी इथली बहुमोल

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

चला करूया सारे आपण
एक अविस्मरणीय भ्रमंती
पाहूया आज डोळे भरून
माझ्या गावाकडची श्रीमंती

ऐतिहासिक वारसा लाभला
माझ्या गावाच्या मातीला
सुपीक जमिनीचे वरदान
आहेच गावाच्या शेतीला

पहाल फिरून चोहिकडे
बहरलेले शिवार असेल
निसर्गाने पांघरलेली प्रसन्न
हिरवाईची चादर दिसेल

काळी कसदार जमीन इथे
या आईचे थोर उपकार
आधुनिक शेतीचा संकल्प
समृद्ध झाला व्यापार

विविध पिके,भाजीपाला
दिसेल फुललेला मळा
याच काळया आईने लावला
इथल्या शेतकऱ्यांना  लळा

शेतात राबणाऱ्या हातांनीच
घडवली अनमोल क्रांती
हीच खरी सुखी, संपन्न
माझ्या गावाकडची श्रीमंती

*श्री. पांडुरंग घोलप*
*रोहोकडी,जुन्नर,पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

डोंगर पायथ्यासी असे गाव
झाडे असे हिरवीगार
शुध्द हवा मिळे आम्हा
चैतन्य तेथे सदा स्वार

माणसं असे साधी भोळी
मिळून राहती ती सारी
सुख दुःखात सहभागी होती
ममता त्यांची असे न्यारी

मदतीला ती सदा तत्पर
मनी त्यांच्या सद्विचार
गावाला कुटुंब समजती
गावाकडची खरी श्रीमंती

शेतीचा मुख्य व्यवसाय
कष्ट करूनी घामगाळती
चेहर्‍यावर सदा हास्य झळके
सम्रृधदीचे गीत गाती

शेतातून फुले हिरे मोती
धन धान्याने भांडार भरती
माणुसकीचा धर्म पाळती
हीच खरी गावाकडची श्रीमंती

*श्री.पुरुषोत्तम वि.ठोंबरे*
*बंधुनगर,झिंगाबाई टाकळी*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️
*गावाकडची श्रीमंती*

झगमगीत शहराची
लाख करावी भ्रमंती
पुरून उरे सार्‍याला
गावाकडची श्रीमंती.. //

गाववाल्यांची दौलत
कशी सांगावी केवढी
घरेदारे छोटीच मात्र
मने आभाळा एवढी..//

मागून पाहावे पाणी
म्हणतील जा जेवून
तृप्तच होईल आत्मा
चटणी भाकर खावून.. //

साधाच हा पाहुणचार
पर उत्साह भरभरून
नाहीच हात आखडते
घालती आग्रह करून…//

शेत शिवारात जाऊन
जे हवे ते घ्यावे तोडून
बोलणार नाही कुणी
कधीच घालून पाडून.. //

पाहुणे जरी शेजार्‍यांचे
होते खुशीने सरबराई
आपुलकीने विचारपूस
मुळीच नसतेय कुचराई..//

दिलदार मनाची माणसं
आहेत अजूनही गावात
जपली आहे माणुसकी
जी दुर्मिळ असे शहरात.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️〽️🌈〽️♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे