शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत मिलींद धोदरे जिल्ह्यात प्रथम
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत मिलींद धोदरे जिल्ह्यात प्रथम
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत जे एस एम काॅलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे शिक्षक श्री मिलिंद प्रभाकर धोदरे यांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत त्यांनी भौतिक शास्त्र (Physics) विषयातील रीहोस्टॅट (Rheostat) वर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करून ऑनलाईन स्वरूपात पाठविला होता.
सदर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती साठी त्यांना रायगड जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून त्यांना सन्मान चिन्ह पदक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲड. गौतम प्रमोद पाटील व काॅलेजच्या प्राचार्या माननीय डॉ सौ सोनाली सुहास पाटील यांनी धोदरे सरांचे आज संस्थेच्या व काॅलेजच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान केल्या.



