
0
4
0
9
0
3
दलबदलू
कडेलोट करुन तत्वाचा
लाजलज्जा खाल्ली विकून
निष्ठाही होऊन हतबल
घेतले तिने डोळे झाकून
आज इथे तर उद्या तिथे
खिशात यांच्या सारे झेंडे
सत्तापिपासू हे दलबदलू
वापरती निरनिराळे फंडे
कट्टर समर्थक मी पक्षाचा
नेतृत्वाम्होरं छाती बडवतो
कोलांटउडी मारुन रातोरात
स्वप्नागत पक्षनिष्ठा बदलतो
सुज्ञ होऊन मतदार राजा
दाखवशील अशाना इंगा
स्वाभीमान विकणारे मग
घालतील तुजभोवती पिंगा
मायबाप जनतेचे तुम्ही सेवक
नका असे स्वैराचाराने वर्तन
जनमानसात रुजवा प्रतिमा
बहुसंख्येने देतील समर्थन
बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड,जि.नांदेड
0
4
0
9
0
3





