
0
4
0
9
0
3
स्वरांगण
सुरेल मधूर सुरांनी
मंतरले,स्वरांगण,
चिमुकल्यांच्या गायनाने
आनंदून गेले सज्जन.
काव्य रसिक जमले
दाद, देण्या कलेला,
हर्ष मावेना माझ्या, मनात
जमलाय, गोतावळा.
सूर प्रतिभा,शब्दांची
सर्वांनाच आवडली,
गेय,सूर, ताल,लयीने
सारी मंत्रमुग्ध झाली.
फिटें पारणें,कानांचे
ऐकून, बालगंधर्वांचे गायन,
ऐकून कल्लोळ भावभावनांचा
रसिक श्रोते, गेले आनंदून.
जपून ठेवेल मी, आई
तू दिलेली शब्दसंपदा,
आशीर्वाद तुझे सोबती
टळणारच संकट, आपदा.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत जि.परभणी
========
0
4
0
9
0
3





