राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीस नागपुरात उत्तम प्रतिसाद
कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांची माहिती
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीस नागपुरात उत्तम प्रतिसाद
कोषाध्यक्ष गुणेश्वर आरीकर यांची माहिती
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: (दि १६) राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये ओबीसीच्या संघटनात्मक बाबीवर चर्चा करण्याकरिता दिनांक १५/४/२०२५ सायंकाळी सहा वाजता ओबीसींच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोषाध्यक्ष श्री गुणेश्वर आरीकर नागपूर यांच्या ऑफिसमध्ये बैठक संपन्न झाली.
ओबीसींच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता दि. २७ एप्रिल २०२५ ला रोज रविवारला सकाळी १० ते २ वाजता पर्यंत पुणे श्रमिक पत्रकार संघ, गाजबे चौक, सदाशिव पेठ पुणे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉ. बबनराव तायवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी महाराष्ट्रातील ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजर राहून आपल्या न्याय हक्काच्या प्रलंबित मागण्या केंद्र व राज्य सरकारकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आयोजन केलेल्या बैठकीस उपस्थित रहावे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे १०वे महाअधिवेशन ७ ऑगस्ट२०२५ ला यावर्षी गोवा येथे होणार आहे. इतर राज्यातून महाअधिवेशनाला मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
काल झालेल्या नागपूरच्या बैठकीमध्ये ओबीसींच्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली १) केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना जनगणना लवकर करण्यात यावी, २) ओबीसी समाजातील ओबीसी समाजबांधवाची सभासद संख्या वाढविणे ३) खेड्यापाड्यात ओबीसींच्या शाखा तयार करणे.४) महा- ज्योती, सारथी, बार्टी गव्हर्मेंट च्या योजनाचा ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देणे योग्य मार्गदर्शन करणे अशा गहन विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, सुभाष घाटे, शकील पटेल, भैय्याजी रडके, परमेश्वर राऊत, गोसावी सर, खुशाल शेंडे, टेंमराज माले, नाखले सर, अरुण भोयर, मारुती पानसे, पद्माकर गावंडे, सुनील मगरे, रवी पानसे, मधुकर गिल्लोरकर, शिवणकर सर, दोडके सर, अभिजीत आरीकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





