0
4
8
2
9
0
प्रेमवाणी
राग लोभ द्वेष मत्सर
काढून टाका मनातून,
प्रेमवाणी निघावी जरा
प्रत्येकाच्या हृदयातून….
अहंकार सोडून द्यावा
प्रेमभाव मनी रुजावा,
हेवेदावे नको कुणाचे
सहिष्णुता भाव वाढवा…
भूमी असे साधूसंताची
शिकवण त्यांची स्मरु,
प्रेमाने जग जिंकायचे
बुद्ध मंत्र अवलंब करू….
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे ही
सुरूवात स्वतःने करू,
कोमल मृदू वाणीमध्ये
ओतप्रोत गोडवा भरू….
गर्व नको करू माणसा
दौलत,घरदार, शक्तीचा,
मानवी देह नश्वर आहे
भरोसा नाहीचं घडीचा….
बी एस गायकवाड
पालम,परभणी
0
4
8
2
9
0



