सायरस पूनावाला हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
सायरस पूनावाला हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे.दि.24 (प्रतिनिधी) डॉ. सायरस पूनावाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इथे गुरू पौर्णिमा उत्सव श्रध्दापूर्वक साजरा करण्यात आला. बाल साहित्यकार संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी भडसावळे यांच्या हस्ते शाळेतील वाचनकट्टयाचे उदघाटन करण्यात आले. प्रसाद भडसावळे आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “चांगला गुरू उत्तमोत्तम शिष्य घडवतो. अनेक रुपात आयुष्याच्या अवघड वळणावर गुरूंचे योग्य मार्गदर्शन लाभले तर शिष्यही आपल्यातील बलस्थाने ओळखून त्रूटींवर मात करत जीवनात यशस्वी होऊ शकतात.” असे सांगून त्यांनी अनेक प्रसिध्द गुरू शिष्य जोड्यांची उदाहरणे दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बदलत्या काळातील गुरूंचे विशेष महत्वं विशद केले. यावेळी विद्यार्थी प्रातिनिधींनी शिक्षकरूपी गुरूंची महती वर्णन करणारी भाषणे केली. प्रशालेच्या वतीने गुरू पौर्णिमेनिमित्त एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रशालेच्या सांस्कृतिक विभागातर्फे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात पाहुण्यांचा परिचय शिक्षक सतीश मुसळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन संगीता करमरकर यांनी केले तर , जयंत पाणबुडे यांनी आभार मानले. गौरी प्रभुणे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.