जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी
प्रतिनिधी भंडारा
जि प उच्च प्रा शा भोजापूर येथे ‘लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी
पवनी: जि.प. उच्च प्रा शा भोजापूर ता.पवनी जि. भंडारा येथे आज दिनांक २३/०७/२०२४ रोजी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती मधुबाला देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. देशमुख मैडम यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मधुबाला देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या भाषणातून दिली. याप्रसंगी विद्यार्थांना त्या काळातील मार्गदर्शनपर माहिती देण्यात आली.
‘शिक्षण सप्ताह’ उपक्रमांतर्गत आज दुसरा दिवस उत्साहात संपन्न झाला. वर्ग १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यासांठी ‘गणित व मराठी भाषिक स्पर्धा’ व विविध नाविन्यपूर्ण भाषिक खेळ घेण्यात आले. तसेच राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, संविधान व राज्यगीत याचाही वैयक्तिक सराव घेण्यात आला. अशाप्रकारे सर्व सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सर्व उपक्रमात सर्व विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन प्रतिसाद दिला. सर्व स्पर्धेत वर्गानिहाय विषय देण्यात आला होता. सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार सुंदर व आकर्षक कल्पनाकृती साकार केल्या. नंतर या उपक्रमाबाबत अभिप्राय व मनोगत घेण्यात आले. विद्यार्थांनी आनंदाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या सर्व उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी आनंदात होते.