*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : ओळखलं काय?🌤️*
*🔹गुरूवार : ०३ / ०१ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ओळखलं काय ?*
हाफ तिकीट फुल तिकीटने
केला होता कितीतरी प्रवास
ओळखलं काय ? का विचारतेस
तुझ्यावर होती भेटीगाठीची आस
*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
काळाच्या ओघात मी आता
पडद्याआड निघून गेलो
ओळखलं काय? मला तुम्ही
मी इतिहासात जमा झालो
*विजय शिर्के,छं.संभाजी नगर .*
*© सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
‘परिवर्तन’ या निसर्ग नियमात
आज माझेही लागली विल्हेवाट
ओळखलं काय? आठवते ना
एस.टी प्रवासात व्हायची भेटगाठ?
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
ओळखलं काय मला?
मी तुमच्या प्रवासातला साथीदार
मी हरवलो तर व्हायचे
तुमच्या चेहऱ्याचे पाणउतार
*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
ओळखलं काय मला
साथ माझी प्रवासापुरती
मात्र मी हरवल्यास
होतसे तुमची गुंग मती
*बी.आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ओळखलं काय?*
मला ओळखलं काय?
लालपरीच्या प्रवासाची साक्षी,
डिजिटल युगात मी कालबाह्य,
बदलले रूप धरा ग्राह्य//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय*
ओळखलं काय मला
होतो मी जिगरी दोस्त
माझ्या विना काम ना होई
झाला आता माझा अस्त ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
डिजिटल युगातील मुलांनो
सांगा मला ओळखलं काय?
बस प्रवास मोबदला रुबाब
तुमचे वडील विसरायचे नाय
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
काळाच्या पडद्याआड
गेले आहे माझे अस्तित्व
मला ओळखलं काय ?
एकवेळ माझं होत कर्तुत्व
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
*ओळखलं काय?*
ओळखलं काय मला
प्रवासातल्या मित्राला
खिशात बसून तुमच्या
जात होतो गावोगावाला.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎🪪💎♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖