ऋणगंधित शब्दपुष्प मराठीचे शिलेदार समूहाप्रती; राजश्री ढाकणे
राजश्री मिसाळ ढाकणे बीड

ऋणगंधित शब्दपुष्प मराठीचे शिलेदार समूहाप्रती; राजश्री ढाकणे
*काव्यरत्न स्पर्धेत सर्वोत्कृष्ट*
*स्थानी उधाण वाऱ्याचे रचना*
*कृतज्ञभाव दाटून येतो मनात*
*ऋणगंधित शब्दपुष्प अर्पिताना*
सर्वांना सस्नेह वंदन
✍️ सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेत दि. ०२-०३-२०२६ रोजी माझ्या “रंगात रंगतो “त्रिवेणी काव्याला व दि.०४-०३-२०२६ रोजी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेत “उधाण वाऱ्याचे”काव्यरचनेला सर्वोत्कृष्ट स्थानी निवडून लेखणीला सन्मानित केले त्यासाठी खास ऋणगंधित शब्दपुष्प शिलेदार परिवारासाठी….
काल विषय वाचला “उधाण वाऱ्याचे ” आणि पटकन ओठांवर गीत आले “मन उधाण वाऱ्याचे…!”… मग पूर्ण अष्टाक्षरी रचना करताना खरी साथ मिळाली ती मनाचीच अवघ्या 20 मिनिटात कविता तयार झाली… मध्येच लिहिताना बहिणाबाईंची कविता पण आठवली “मन वढाय वढाय ” आणि मग “अष्टाक्षरी काव्यरचना “लिहायची असं मनाने ठरवलं ; आणि मनाचं ऐकून काव्यरचना लिहिली… काही ऱ्हस्व दीर्घ चुका किंवा एखाद्या ओळीत जास्त अक्षरे झाली का वाचून बघितले आणि मग समूहात पाठवली… तिथं सविताची रचना दृष्टीस पडली खूप दिवसांनी सवूने काव्य लिहिले आहे आणि अगदी उत्कृष्ट लिहिले अगदी अव्वल स्थान तिचेच असायला हवे होते असे मनाला वाटले,,,पण ती स्वतः एक आदर्श परीक्षक/नि:पक्षपातीपणे परीक्षण करून माझी रचना अव्वल स्थानी विराजित केली…!
आज सकाळी सविताचे परीक्षण वाचले आणि अभिप्राय लिहितानाच मन उधाण वाऱ्यासारखे धावत होते मी फक्त त्याचं ऐकून लिहीत होते अगदी किती लिहू नि किती नाही असे झाले होते,,, पण मनाला आवर घालून अभिनंदनीय शुभेच्छा देऊन संपवले. तोपर्यंत सर्वोत्कृष्ट रचनेची लिंक आली…मला सर्वांच्या रचना वाचायला खूप आवडतात म्हणून उघडली आणि पहिलीच रचना वाचनात गुंग झालेलं मन दुसऱ्या कडव्यात भानावर आलं कारण शब्द ओळखीचे वाटले…!.. मग बघितलं तर माझं नाव दिसलं…. मग आणखी एकदा काव्यरचना वाचली कारण स्त्रीसुलभ मनाचं वैशिष्ट्य असं असतं की, तिची साडी, पर्स, दागिने अगदी कोणतीही वस्तू जेव्हा एखादी मैत्रीण म्हणते खूप सुंदर आहे..!.. कुठून घेतली? किंमत? वगैरे वगैरे मग आपली निवड सुंदर आहे असं मनाला वाटतं आणि ती वस्तू अधिकच आवडते.. अगदी तसंच झालं माझीच कविता अक्षरशः दोनदा वाचली मी…!..(ती माझी नेहमीची सवय आहे. ) मग सर्वांच्या काव्यरचना वाचल्या सर्वांच्या रचना एकसे बढकर एक अशाच आहेत,,, पण त्यात मला आणखी विशेष म्हणजे वनिता ताईची कविता खूप आवडली…!..
“मन उधाण वाऱ्याचे
पण नियंत्रण हवे
नको चुकीचे वागणे
नित्य मना बजवावे “
माझ्याच कवितेतील हे शेवटचे कडवे आहे…आज खरंच मन उधाण झालेलं होतं पण ते कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी,,,पुन्हा काय अडचण येईल आणि मनोगत तसेच राहून जाईल आणि त्याचं शल्य मनात टोचत राहील त्यापेक्षा आजचं कोणतं तरी काम टाळायचं आणि शिलेदार परिवाराशी सुसंवाद साधायचा असं या “उधाण मनानेच “ठरवलं म्हणून तर मनोगत सुद्धा भरभर लिहिता आलं…लिहिलं तरंच मनातला ऋणभार हलका होतो म्हणून लिहिलंच पाहिजे… पण कधी कधी होतं अशक्य…. शिलेदार परिवारात फार समंजसपणा आहे.. नेहमीच एकमेकांना समजून घेतात,,, कौतुक करतात,,, कुठलीही द्वेष भावना मनात नसते,,, एकमेकांना मार्गदर्शन ही करतात आणि सर्वांच्या आनंदात सहभागी पण होतात…!.. दुःखात सुद्धा सर्व परिवार सोबतीला असतो.. एवढा सुंदर परिवार लाभला केवळ शब्दाने ऋण फिटणार नाही पण फक्त “कृतज्ञभाव”व्यक्त होतो… माझ्या लेखणीचे शेपूट मारुतीच्या शेपटीसारखे लांबतच जाते… थांबण्यापूर्वी “ऋणगंध शब्दपुष्पाचा”या सर्वांसाठी जे अहोरात्र मेहनत घेतात “माय मराठीची सेवा निःस्वार्थ पणे करतात …!..”
“माझ्या मनाला आनंद देणारे
लेखणीचा सन्मान करणारे
मराठी साहित्यिक घडवणारे
माय मराठीचे पुत्र कन्या खरे..!”
लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी सर्वप्रथम या शिलेदार परिवाराचे ध्येयवेडे आणि कुशल संस्थापक, संपादक, नावीन्यपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, देवांश म्हणजे आपले आ. राहुल दादा पाटील, सावली सारखी अहोरात्र साथ देणाऱ्या आ. सौ. पल्लवीताई, मुख्य प्रशासक /परीक्षक /कार्यकारी संपादक माझी सखी सौ.सविता पाटील ठाकरे, आ. प्रशांत भाऊ ठाकरे,आ. विष्णुदादा, आ.संग्राम दादा, आ. अशोक दादा, आ.अरविंद दादा, प्रिय सौ. स्वाती मराडे,प्रिय आ. वृंदाताई, माझी सखी प्रिय शर्मिला ताई, प्रिय सखी तारकाताई, प्रिय सखी प्रतिमा ताई… साप्ताहिक साहित्यगंधचे सर्व संपादक मंडळ… अगदी सर्वांचे मनःपूर्वक ऋणयुक्त अनंत धन्यवाद
माझ्या लेखणीवर कौतुकाचा वर्षाव करणारे… अर्थात लेखणीची ताकद /बळ असणाऱ्या शिलेदार परिवारातील सर्व आ. दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप ऋणयुक्त अनंत धन्यवाद…!…आजच्या स्पर्धेतील सर्व सहभागी /विजेत्या सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि सर्वांच्या साहित्यिक प्रवासास अभिनंदनीय शुभेच्छा…!!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह



