Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक मानसिकता गरजेची; डॉ विजय कोकणे

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 6 5 2

महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक मानसिकता गरजेची; डॉ विजय कोकणे

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे व जे.एस.एस रायगड यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: (दि ७ मार्च) भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालयाच्या माध्यमातून माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये संस्थापक अध्यक्षा डॉ मेधा सोमैया व डॉ नितीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड व डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणारे च्या स्वयंसिद्ध समिती हयांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील महिला,युवती व भगिनींसाठी “जागतिक महिला दिनाचे” औचित्य साधून शनिवार दिनांक 07 मार्च 2026 या रोजी महिला कौशल्य जनजागृती कार्यशाळेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले होते.

सदर मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी महिला सक्षमीकरणासाठी सकारात्मक मानसिकता गरजेची किंमत मुख्य प्रशिक्षण व जे.एस.एस रायगडचे संचालक डॉ विजय कोकणे ह्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी समन्वयक डॉ संगीता मेटकर यांनी “स्वयंसिद्ध महिला उपक्रमांतर्गत” जागतिक महिला दिन साजरा करून महिलांना सकारात्मक दृष्टिकोनातून प्रेरित करण्याचा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठने सदर व्यासपीठ उपलब्ध करून दिली असल्याची माहिती दिली

सदर जागतिक महिला दिनानिमित्ताने उद्घाटन कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू मा. कर्नल डॉ कारभारी.वि.काळे(कुलगुरू), डॉ अमित शेष (कुलसचिव), डॉ. संजय नलबलवार (अधिष्ठाता),डॉ संगीता मेटकर (कार्यक्रम समन्वयक), प्राध्यापक महिला-भगिनी व युवती यांच्या उपस्तिथीत जागतिक महिला दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे