0
4
8
2
9
0
कुठे सापडे सत्य सांगा
कधी शोधतोय पाषाणी,
कधी शोधतो चराचरात…
शोधून थकला जीव हा,
सापडेना सत्य उरात…१
घातलीय पालथी धरा,
स्वर्ग पाताळ मृत्यू लोक…
सापडली कुठेच नाही,
सत्य प्रवृत्ती बिनधोक…२
कानी ऐकलेत कैकदा,
प्रत्यक्षी उतरले नाही…
कथनी आणि करणीत,
साम्य कधी दिसले नाही…३
कुठे सापडे सत्य सांगा?
असत्याचा ढोल वाजते…
‘सुधाकरा’ मुजोरीतचं,
सत्ता ही अबोल गाजते…४
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
9
0



