
0
5
9
0
3
9
पुस्तकांचे महत्व
पुस्तकांचे महत्व जीवनी
पुस्तक असे ज्ञानाचे भांडार
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर
जीवनाला देईल आकार
पुस्तक असे ज्ञानाची तिजोरी
बुद्धी कौशल्य असे भंडार भारी
ज्ञानाची असेलच जादुगिरी
पुस्तक ज्ञानाची पहिली पायरी
पुस्तकी ज्ञानाने अंधार दूर करे
मोठे स्वप्न साकार करूनी
परिस्थितीवर मात करुण जिंकतो
मिळे ज्ञानप्राप्ती साहित्यानी
कथा ,कादंबरी वाचनाचा छंद
जोपासतो तो पुस्तकातून
कलाटणी मिळे जीवनाला
ज्ञानवृध्दी होईल बुद्धीतून
पुस्तके भाव विश्व ज्ञानाचे
सखा, सोबती जीवनाचा
दुःख सोडून सुख मिळेल
मार्ग मिळे दिप तो ज्ञानाचा
कुसुम पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर
===========
0
5
9
0
3
9



