Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

जे.एस.एम.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जे.एस.एम.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग.(दि २३): कॉमर्स विभाग व बी.एम.एस.विभाग व आय. क्यू. ए. सी. जे.एस.एम. महाविद्यालय अलिबाग आणि डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “Commerce & Management in Digital Era:
Trends, Challenges & Innovations” या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन शनिवार दि. 22 फेब्रुवारी 2025 रोजी जे.एस.एम. महाविद्यालयाच्या कै. जयवंत केळुसकर सभागृहात करण्यात आले.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी चर्चासत्राचे बीजभाषक म्हणून मा.डॉ. कामिनी शहा, प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ बिझनेस स्टडीज अँड डीन, सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरात, मा. डॉ. अमित फाटक, प्रोफेसर, युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड सायन्स, ओमान हे उपस्थित होते. तर या चर्चा सत्रात मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. संगीता पवार, प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि मा. डॉ. व्ही. जे. भंडारे, प्रोफेसर, रिसर्च गाईड, पी. इ. एस. सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, फोर्ट, मुंबई आणि मा. डॉ. हरिचंदन, प्रोफेसर, माजी संचालक, आयडॉल, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आणि मा. डॉ. सुष्मिता मुखर्जी, फॅकल्टी, अल्केश मोडी इन्स्टिट्यूट (मॅनेजमेंट अँड मार्केटिंग ट्रॅक) हे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य, मा. डॉ. सोनाली पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चासत्रासाठी शुभेच्छा दिल्या.

डिजिटल युगाने वाणिज्य आणि व्यवस्थापनाच्या प्रत्येक पैलूमध्ये क्रांती घडवून आणत असताना ई-कॉमर्स ते कृत्रिम बुद्धिमत्ता इथपर्यंत प्रचंड संधी उपलब्ध केलेल्या आहेत. तसेच नवीन बदलांशी जुळवून घेण्यासंबंधित आव्हाने देखील निर्माण झालेली आहेत, असे मत अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांनी उद्घाटनाच्या वेळी व्यक्त केले. डिजिटल परिवर्तनामुळे आपण व्यवसाय करण्याच्या, निर्णय घेण्याच्या आणि नवकल्पनांना चालना देण्याच्या पद्धतीला नवीन आकार देत आहोत असे मत चर्चासत्राचे बीजभाषक मा.डॉ. कामिनी शहा यांनी व्यक्त केले.

सदर चर्चासत्रात डिजिटल विपणन धोरणे, आर्थिक तंत्रज्ञानातील अडथळे, जागतिक व्यापारातील परिवर्तन, डिजिटल क्षेत्रातील ग्राहकांचे वर्तन आणि भविष्यातील कामगारांची अनुकूलता यासह अनेक महत्त्वांच्या विषयांवर विचार मंथन करण्यात आले.

कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. बी. आचार्य यांनी चर्चासत्राचे प्रास्ताविक सादर केले. प्रा. कपिल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर उपस्थित सर्वांचे आभार प्रा. श्वेता पाटील यांनी मानले.

या चर्चासत्रात देशातील व राज्यातील विविध विद्यापीठातून संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी आपला सहभाग नोंदवून आपले शोधनिबंध सादर केले. प्रा. डाॅ. पी. बी.आचार्य, प्रा.श्वेता पाटील, प्रा.अश्विनी आठवले, प्रा.विनायक साळुंके, प्रा. शंतनु वालदे, प्रा. प्रीती पाटील, प्रा.श्वेता मोकल, प्रा. अश्विनी दळवी, प्रा. आदिती दामले, प्रा.अक्षता इंगळे, प्रा. सायली वैशंपायन यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी या चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे