
0
4
8
2
9
3
धिंगाणा
परतीचा पावसाचा, धिंगाणा सुरू झाला..
आता तर मुलांनाही , त्याचा वैताग आला..
काळे काळे ढग , गडगडाट करतात
भयावह आकार पाहून, सारीच घबरतात…
वीज चमकते कधी, कधी मोठा उजेड..
आमचा गणु म्हणे ह्याला लागले का वेड?..
नको शाळेभोवती तळ्यात साचू दे पाणी..
पाऊस वाटतोय आता कंटाळवाणी…
शाळेत जाऊन आता,म्हणायचीये गाणी..
अभ्यास झाल्यावर,बाई सांगतात कहाणी..
देवा ह्या पावसाला घेऊन जा लवकर..
फिरू दे आम्हाला, बिनधोक गावभर..
पावसासारखा आम्हाला धिंगाणा घालायचा
विटीदांडू,गोट्या,क्रिकेट मैदानात खेळायचा
मृदुला कांबळे
गोरेगांव -रायगड
0
4
8
2
9
3



