ई-पेपरकविताखानदेशदादरा नगर हवेलीनागपूरमहाराष्ट्रविदर्भ
महिलादिन
सौ. सविता पाटील ठाकरे, सिलवासा दा.न.ह.
0
4
8
2
9
7
महिलादिन
सहन करेन सारे काही, असहाय्य अश्रू नाही..
जन्म माझा लढण्यासाठी, रडण्यासाठी नाही..
नाहीच मी अबला नारी,बनेन कठीण वज्रापरी..
जिजाऊ मी सावित्री विपत्तीचा पर्वत सर करी ..
सोडून देईन लाटांचे भय,अन् वा-याचेही वय..
जाळून टाकेन पुरुषी डंका, दुःखाचीही सय..
वैशाख घेऊन संगती,फोडेन खडक अन् पत्थर..
आभासी ही दुनिया सारी, कशाला पसरू पदर..
तामसी वृत्ती टपलेली,तरी का रडू अशोकवनात..
सारे नभ कवेत कोंडण्याचा, वज्रनिर्धार मनात..
मी तर सूर कोकिळेचा,गीत नव क्रांतीचे गाईन..
झेप अशी गगनी की,रोजच महिलादिन येईन..
झेप अशी गगनी की,रोजच महिलादिन येईन..
सौ. सविता पाटील ठाकरे, सिलवासा दा.न.ह.
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
9
7



