Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील 7385363088

0 4 8 2 8 6

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🥀विषय : वर्ष रसतांना🥀*
*🍂बुधवार : २४ / डिसेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९८ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*

वर्ष सरताना जागतील
काही जुन्या आठवणी
आसू आणि हासूची
असेल वेगळीच कहाणी

किती आनंदाच्या राशी
मोजाव्या तरी कशाला
दान परमेशाचें होते
सुख लोळले उशाला

काही अकल्पित घडले
नको वंचना काही
विसरून झाले गेले
पाऊले व्हावीत प्रवाही

वर्ष सरताना जागवा
हृदयात नवा हर्ष
वाण घेऊन चैतन्याचे
आले पुन्हा नवे वर्ष

नववर्षाच्या स्वागतास
करावी लगबग सारी
हे नवीन पर्व येईल
घेऊन आनंदाची वारी

संकल्प नवे काही
असावे मनाच्या कुपीत
उतरतील सत्यात जेव्हा
साकार होईल ईप्सित

वर्ष सरताना जुने
नवा आळवावा सूर
राहो सकलजन सुखी
येवो आनंदाला पूर

*श्री. पांडुरंग एकनाथ घोलप*
*रोहोकडी, जुन्नर, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*

तोच सूर्य तोच चंद्र, दिसामागे रात फिरताना
अजून एक पाहिले, पला पलाने वर्ष सरताना.//

अमाप सुख क्षणांची, कधी ओंजळ भरताना
कधी आगन्तुक संकटाशी,दोन हात करताना.//

पाहिले कुणाच्या येण्याने, घर अंगण हसताना
पाहिले कुणाच्या जाण्याने, ते हमसून रडताना.//

पाहिले कुणाला कुणाशी, नातीगोती तोडताना
कुणी हळवे लाघवी, पाहिले नव्याने जोडताना.//

पाहिले कुठे कुणाला,आघाताने मोडून पडताना
कुणी घाव खोल झेलूनही,पाहिले पुन्हा घडताना.//

लहरीबाज निसर्गाची, कृपा अवकृपा झेलताना
पाहिले इथे बळीराजाला, नवा जुगार खेळताना.//

पाहिले राजकीय नेते,सत्तेचा सारीपाट मांडताना
विरोधकांना मिळताना,कधी आपसात भांडताना.//

इथे घोर कलियुगाचे, एक एक पत्ते खोलताना
पाहिले वर्षे सरताना, असेच ऐकलय बोलताना//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*

कधी हसत जगणे
कधी विरहात जळणे
वर्ष सरतांना अनेक
आठवणी मनी जपणे

कधी मैत्रीणी सोबत क्षण
कधी कुटुंबाचे गाऱ्हाणे
कधी प्रवास सुखकर
कधी स्वतःला सावरणे

पहाट व्हायची पक्षी गायचे
फुले उमलायची ऊन पडे
तोच दिवस तीच रात्र पण
काहीतरी नित्य नवीन घडे

वसंत फुलवून हर्षउल्लासित
आयुष्याची सकाळ यायची
कधी विचाराच्या उदास क्षणी
आयुष्याची संध्याकाळ व्हायची

हृदयात कायम जपावे असे
वर्ष सरतांना खुप काही दिले
जगता जगता क्षणभंगुर हे जीवन
नकळतच कॅलेंडरचे पान पलटले

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*

वर्ष सरतांना पाहिल्या
जुन्या कॅलेंडरवरच्या नोंदी
ठीकठाक तर आहे सर्व
नाही खर्च अनागोंदी
दुधाची चंदी बचत गटाचे देने
मुलांच्या ट्यूशनची फी
न चूकता तर भरली
शेवटी हाती दमडी उरली
नवं वर्ष येईल
पुन्हा तोच हिशोब
राहूनच जाईल मग
यांचा बनवायचा गोप
तेही जातात नोकरीवर
पगार देतात हाती
कधीही शिकन नसते
त्यांच्या हो माथी
तेच पुन्हा रहाटगाडगे
नव्या वर्षालाही ओढायचे
वर्ष सरतांना आता कशाला
आपल्या नशिबावर रडायचे
होईल सर्व ठीक
मनगटावर भरोसा आहे
जातील हेही दिवस
तोवर आधार झोपडीचा आहे

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*

झुलू लागला वर्ष सरताना
आठवणींचा तो हिंदोळा
घडून गेल्या ज्या घटना
मनाचा सुरू जाहला धिंडोळा

सुखद घटनांनी अनुभवले
सुखाचे अमोलिक क्षण
दुःखद वार झेलुनिया
मनाला आले सुनेपण

नवे वर्ष होते मागील
होईल आता जुन्यात जमा
क्षण,दिवस,महिने यांची
निरीक्षणांनी खातरजमा

जुने वर्ष सरताना
हउजाडणार नविन वर्ष
टाळून चुकांची पुनरावृत्ती
येवो सर्वांच्या जीवनात हर्ष

जाणा-या वर्षानी दिले
अनुभवांचे उत्तुंग साठे
जपून तयांना चालू पुढे
स्वागतार्ह नववर्ष गडे

*श्रीमती सुलोचना लडवे*
अमरावती
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*

वर्ष सरताना हो आता
हिशेब काय ते ठेवायचे
मधुर क्षणांचा ठेवा जपून
कटू क्षण ते विसरायचे

काळ निरंतर पुढे जाता
भरभरून आयुष्याने दिले
हिशेब काय ठेवायचे आता
जे आपणा नाही मिळाले

दु:ख दारुण वाट्याला आले
कर्मभोगच ते म्हणायचे
सुखाचे पारडे जड म्हणायचे
दु:खाचे हिशेब का ठेवायचे

कितीतरी मित्र इथे भेटले
ताटवे त्यांनी दिले फुलांचे
काट्यांच्या हो टोचणीचे
हिशेब कशाला ठेवायचे

नवे काही फुलू पाहताना
मंत्र आठवावे सृजनाचे
जे दिवे विझून हो गेले
तेज तयांचे आठवायचे

सरते वर्ष जात असता
मनी फुलवल्या हो आशा
वाटेत भेटतील मळे सुगंधी
कशाला आठवायची निराशा

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*वर्ष सरताना*

काही स्वप्ने धुमली आत,
काही उरले ऋणे हवे,
वर्ष सरताना देऊन गेले,
अनुभवाचे धडे नवे !! १ !!

​कुणी लाभले, कुणी मुकले,
मुखवटेही स्पष्ट झाले,
वर्ष सरताना जगाचे,
रंग अमुच्या मना उमजले !! २ !!

​काही जखमा ओल्या अजुनी,
काही वाटा थांबल्या,
वर्ष सरताना पावलांना,
दिशा मात्र उमजल्या !! ३ !!

​जुने मळभ झाडून आता,
मन करूया पुन्हा सज्ज,
वर्ष सरताना क्षितिजावर,
उधळूया प्रीतीचा ध्वज !! ४ !!

​नको तक्रार, नको खंत,
नको आता रडगाणी,
वर्ष सरताना लिहूया,
सुखाची नवी गाणी !! ५ !!

​प्रत्येक शेवट असतो,
एका नवयुगाचा अंत,
वर्ष सरताना फुलू दे,
आयुष्यात सुखाचा वसंत !! ६ !!

*प्रा. डॉ गोविंद पांडुरंग चौधरी (देव)*
*जि. नांदेड*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरताना*

ठरवलेले सुरुवातीला
झाले का, पाहताना
सतत मनात विचार
यंदाचे वर्ष सरताना

मनासारखे झाले नाही
खंत राहिली म्हणताना
बऱ्या-वाईट गोष्टी झाल्या
यंदाचे वर्ष सरताना

हवालदिल, रडकुंडीस
आज शेतकरी दिसताना
हेलावून जाते काळीज
यंदाचे वर्ष सरताना

संपूर्ण वर्ष दिसले
आंदोलनांनी गाजताना
चिरडली आंदोलने
यंदाचे वर्ष सरताना

सोन्या-चांदीचा दिसतो
भाव गगनाला भिडताना
रुपया मातीमोल दिसतो
यंदाचे वर्ष सरताना

*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*

जुना वर्ष सरताना
चाहूल नव वर्षाची
जे झाले ते गेले सर्व
स्मृती जुन्या आठवणींची

हा वर्ष सरताना आम्हा
राहील आठवण सुखदुःखाची
मनात न ठेवता विरंगुळा
मांदियाळी करा नव वर्षाची

विसरू सारे सुख दुःख
सदा रहावे हसमुख
सकारात्मक विचाराने करू स्वागत
नव वर्षात राहू हसत खेळत

कसे गेले आपले दिवस
हे ठेवूच नये मनात
नव चैतन्याची उगवती पहाट
हेच ठेवा आपल्या ध्यानात

जुन्या वर्षातील अनुभवावर
नव्या वर्षाची करा सुरवात
नव दाम्पत्यांनी थाटून नवा संसार
एकमेकाची बनावे दिवा आणि वात

वर्ष सरतांनी करा गुडबाय
नव्या वर्षाला करा हाय हाय
येणारा वर्ष सुखात जावो
खूप करावे सर्वांनी एन्जॉय

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️
*वर्ष सरतांना*

वर्ष सरतांना सांगून जातंय
सन,महिना जाईल बदलून,
जाता जाता स्मृतीचा ठेवा
मनामनात जाईल जागवून.

कटू गोड आठवणींचा इथं
हिशोब होईल अनुभवाचा,
प्रत्येक महिन्यात आलेल्या
विविध प्रासंगिक घटनांचा.

उजाळा मिळतोय स्मृतींना
चित्रपट उभाच वर्षभराचा,
काय कमविले व गमविले
ताळमेळ बसेल कर्तुत्वाचा.

देऊन गेलंय सरते वर्ष खूप
मानवी वृत्ती वाढलीय भूक,
समाधानी प्रवृत्ती नसे राही
अपेक्षाभंग नको करू चूक…

वर्ष सरतांना द्यावा निरोप
सज्ज स्वागतास नववर्षाला,
आपापल्यापरी साकार करा
योग्य आकार द्या जीवनाला.

उगवत्याला नमस्कार आहे
मावळत्या सोडी नजरेआड,
अनुभवाची शिदोरी सोबती
जीवन नौका नेईल पल्याड.

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🍃➰🍃♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे