सरस्वती नगरातील हनुमान मंदिरात जागतिक योग दिवस साजरा
नागपूर जिल्हा प्रतिनिधी (बिनधास्त न्यूज)
सरस्वती नगरातील हनुमान मंदिरात जागतिक योग दिवस साजरा
नागपूर जिल्हा प्रतिनिधी (बिनधास्त न्यूज)
नागपूर: श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व हास्य योगा क्लब तर्फे जागतिक योगादिवसा निमित्ताने सरस्वती नगरच्या हनुमान मंदिरात 21 जून जागतिक योगा दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रत्येक नागरिकांचे आरोग्य निरोगी व स्वस्थ ठेवण्यासाठी सर्वांना योग व प्राणायामाची आवश्यकता आहे. योग साधनेमुळे आपलं जीवन निरोगी राहते. यामध्ये आसणे, योगासने आणि योग साधना या हेतूने 21 जून योग जागतिक दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजपाल सिंग बैस तसेच कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी गजानन शेळके, प्रवीण ठाकरे सामाजिक कार्यकर्ते, तसेच महिला योगा क्लबच्या अध्यक्षा श्रीमती अर्चनाताई शिरसागर, सुनील बिंगेवार मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात योग नृत्य कल्पना चावले, सुनंदा निमकर, रूपाली तायवाडे, सोनू मेश्राम, शामल चरोडे यांनी केली. त्याच प्रमाणे वंदना बिगेंवार, निशा खवले यांनी योग, आसने, करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच हास्य योगाचे वेगवेगळे हास्य करण्यात आले. या कार्यक्रमात हास्ययोगाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच सदस्य पी.आर.नेरकर व ए.पी.सिंग, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन सिद्धार्थ कांबळे यांनी केले.
प्रास्ताविक अनंत गुंडलवार यांनी केले तर रामक्रष्ण बांगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला तिन्ही योगाचे सदस्य उपस्थित होते. तसेच जागतिक योग दिवस २१ जून हा सर्वात वर्षातील मोठा दिवस असून साजरा करण्यात आला. याप्रसंगी विजय लांजेवार, जॉन गायगोले, प्रमोद झाडे, डॉ. विजय बागडे, सुरेन्द्र शर्मा, सुरेश बोरकर, अशोक निमजे, श्री त्रिलोकीचंद लांजेवार याप्रसंगी हे उपस्थित होते.