
0
5
1
7
9
5
रंग होळीचा
रंग होळीचा लावलेला तरं
आज न उद्या निघून जाईल,
रंग आपुलकी अन् प्रेमाचा
चिरकाल स्मरणात राहील..!
रंग होळीचा तो खेळतांना
येतील नानाविध रंग धावुन,
कदाचित त्यातूनही जाईल
राष्ट्रीय एकात्मता ही घडून..!
केशरी,पांढरा हिरवा रंगही
सांगती आपापले गुणधर्म,
वर्णिता निळा,लाल,पिवळा
त्याचेही उमजू लागेल मर्म..!
वापरा रंग गुलाबी फुलांचा
प्रतीक प्रेमाचे उठून दिसेल,
काळ्यावरती पांढराशुभ्रही
अस्तित्व अबाधीत टिकेल..!
गर्व कशाला करतो माणसा
तू उगाचचं समज हा रंगाचा,
रंगावरून नको करू पारख
सांगत असे रंग हा होळीचा..!
बी एस गायकवाड
पालम, जि.परभणी
========
0
5
1
7
9
5



