
0
5
5
6
4
4
दिव्यप्रकाश
लेखणीतून रे दिव्यप्रकाश
काव्यांगणी या पसरावा
नेत्रदीपक रे शब्दपुष्पांनी
काव्यनाद गगनी गुंजावा
शब्दगुंफन रे दिव्यप्रकाशी
स्वप्नझेप घेण्या आकाशी
काळजातील रे आर्त हाक
शब्दगदेचा दाखवील धाक
नात्यातील रे तो ओलावा
संकटकाळी धावूनच जावे
भावनांना हुंदके रे फोडून
स्नेहबंध रे घ्यावा जोडून
जागवून वास्तवाचे भान
कष्टानंच फुलवा माळरान
भविष्याचा रे घेऊन वेध
स्वप्नरंजनास रे देऊन छेद
लेखणीचा हा दिव्यप्रकाश
भरारीचा लावेल मनी ध्यास
सुखाची त्या लागता चाहूल
जमिनीवरच असावे पाऊल
संग्राम कुमठेकर
ता. जिल्हा लातूर
=======
0
5
5
6
4
4



