आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितादादरा नगर हवेलीदेश-विदेशविदर्भसाहित्यगंध
भिजली माती
सुजाता सोनवणे. सिलवासा दादरा नगर हवेली
0
4
8
2
9
3
भिजली माती
धो धो बरसल्या पाऊससरी
अनंत हर्ष दाटला उरी
भिजली माती भिजले रान
बालचमूंची मज्जाच न्यारी.
ए आई आई मला शाळेत
जायची गं आहे घाई
छत्री माझी घेऊन आधीच
निघाली ही लबाड ताई.
पावसात चिमुकले शाळेत
रान शिवारातून येती जाती
कपडे माखतच अनवाणी
चिखलातून वाट तुडवती.
भर पावसातही घरापेक्षा
ओढ आगळीवेगळी शाळेची
कागदाच्या होड्या बनवून
मजा पाण्यात सोडण्याची.
मध्येच ऐकू येतेय कानी
बेडुकरावांची डराव डराव
शाळेतच खरा वसलाय
चिमुकल्यांचा प्रेमाचा गाव.
पाऊस ओसरल्यावर बनवी
भिजल्या मातीची खेळणी
उत्साह ओसंडून वाहे मनी
सप्तरंगाची उधळण जीवनी.
सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली
======
0
4
8
2
9
3



