Breaking
ई-पेपरगुन्हेगारीनागपूरमहाराष्ट्रराजकियविदर्भ

वानाडोंगरी जमीन हडप प्रकरणात राजकीय संरक्षणाचा आरोप

गजानन ढाकुलकर, हिंगणा प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

वानाडोंगरी जमीन हडप प्रकरणात राजकीय संरक्षणाचा आरोप

गैर अर्जदार शहाकार गटाविरुद्ध गंभीर तक्रार, कारवाई मात्र ठप्प

गजानन ढाकुलकर, हिंगणा प्रतिनिधी

नागपूर : वानाडोंगरी परिसरातील वडिलोपार्जित जमिनीची बेकायदेशीर हडपशाही, बनावट कागदपत्रे, महसूल फसवणूक आणि राजकीय संरक्षण या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण वानाडोंगरी शहरच नव्हे तर हिंगणा तालुका हादरून गेला आहे. या प्रकरणातील मुख्य गैर अर्जदार / आरोपी म्हणून शहाकार परिवार व त्यांचे सहकारी यांची नावे थेट नमूद केली असूनही, तक्रारदाराचे म्हणणे आहे की “हे सर्व सत्ताधारी भाजपाशी नाते असलेले कार्यकर्ते असल्याने कारवाई मुद्दाम थांबवली जाते.”

तक्रारदार श्रीमती सिंधू रामकृष्ण नरुले यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केलेल्या अर्जात थेट ज्या व्यक्तींवर आरोप केले आहेत, त्यांची नावे :
१) सतीश भाऊराव शहाकार (माजी सरपंच)
२) वर्षा सतीश शहाकार (माजी नगराध्यक्षा)
३) राजू सेवकराम शहाकार (शहाकार गृह निर्माण संस्था संबंधित)
४) अविनाश सेवकराम शहाकार (गृह निर्माण संस्था संबंधित)
याशिवाय—
५) काही माजी महसूल अधिकारी
६) माजी नोंदणी विभागातील कर्मचारी
७) तत्कालीन MIDC पोलीस ठाण्यातील काही अधिकारी
यांच्यावरही संगनमत, गुन्हे दडपणे, चार्जशीटमधून नाव हटवणे, बनावट नोंदणी यांचे गंभीर आरोप आहेत.
तक्रारदाराचा धक्कादायक आरोप :
“शहाकार गटाला राजकीय संरक्षण—म्हणून तपास टाळला जातो!”
वानाडोंगरी येथील प.ह.नं. ४६, खसरा क्रमांक ३५०–३५४ ही जमिन नरुले कुटुंबाच्या नावे महसूल नोंदीत आजही अस्तित्वात असताना, गैर अर्जदार शहाकार परिवाराने—
बनावट कागदपत्रे तयार केली,
बोगस गृह निर्माण संस्थेचा वापर,
खोटे ठराव, फर्जी बैठका, अनधिकृत प्लॉटिंग , शासन महसूलाची फसवणूक , असे बहुपदरी गुन्हे केल्याचे तक्रारीत स्पष्ट नमूद आहे.
*सर्वात गंभीर मुद्दा* :
“MIDC पोलिसांनी मुख्य आरोपीचे नाव चार्जशीटमधून काढले!”
तक्रारदाराचे विधान अत्यंत संवेदनशील—
> “गुन्हा माझ्या पुराव्यांवरून दाखल झाला, परंतु मुख्य आरोपी सतीश भाऊराव शहाकार यांचे नाव चार्जशीट मधून गायब केले गेले! हे अधिकारी–राजकारणी संगनमताशिवाय शक्य नाही.”
ही बाब कायदेशीर दृष्ट्या अत्यंत गंभीर मानली जाते.
चार्जशीटमध्ये हस्तक्षेप हा स्वतः मोठा गुन्हा असून यात पोलीस अधिकाऱ्यांवरही चौकशीची गरज निर्माण झाली आहे.
शासन महसूल फसवणूक : लाखो रुपयांचे नुकसान?
जमीन दर अत्यल्प दाखवून व्यवहार
स्टॅम्प ड्युटी टाळणे, बोगस प्लॉटिंग, अनधिकृत परवानग्या यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप तक्रारीत आहे.
वर्षा शहाकार यांच्या शपथपत्रातील मालमत्तेत प्रचंड तफावत?
तक्रारीनुसार—
माजी नगराध्यक्षा वर्षा सतीश शहाकार यांच्या मालमत्तेत अचानक मोठी वाढ दिसून येते, परंतु शपथपत्रात त्या मालमत्ता नसल्याचा दावा. हा मुद्दा काळा पैसा, न जाहीर केलेले उत्पन्न आणि भ्रष्ट आर्थिक व्यवहार याची शक्यता वाढवणारा आहे.
MCOCA व PMLA अंतर्गत कारवाईची मागणी
तक्रारदाराने नमूद केले आहे की—
जमीन हडपशाही, आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे,
सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत, काळा पैसा उभारणे
ही सर्व कृत्ये Organised Crime Syndicate म्हणजेच संगठित गुन्हेगारी टोळीचे स्वरूप धारण करतात.
म्हणून तक्रारदाराने MCOCA आणि PMLA लागू करण्याची थेट मागणी केली आहे.
तक्रार असूनही कारवाई शून्य—तक्रारदाराचा संताप वाढला
> “सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यामुळेच फाईल पुढे सरकत नाही. मी न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही.” श्रीमती सिंधू नरुले
पीडितेने अधिवेशनादरम्यानही ही तक्रार मंत्र्यांच्या कार्यालयात सादर केली, परंतु आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, असा आरोप आहे. आरोपी सर्वजण एकाच राजकीय गटाशी संबंधित?
त्यामुळेच पोलीस तपास अडकवला जातो?
महसूल विभागातील अधिकारी आरोपींच्या ताब्यात?
बनावट गृह संस्था वापरून शेकडो लोकांची फसवणूक?
वानाडोंगरीतील भूमाफिया रॅकेट अजूनही सक्रिय?
*मोठा प्रश्न* :
“नागपूर जिल्ह्यात भूमाफिया राजकीय संरक्षणाखाली वाढत आहेत का?”*
ही घटना फक्त एका कुटुंबाची जमीन हडपशाही नाही—
हे नागपूर प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राजकीय दबावाच्या धोकादायक संगनमताचे भयावह उदाहरण आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे