बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सहा🎗🎗🎗*
*🥀विषय : मुक्तिसंग्राम🥀*
*🍂बुधवार : १७/ सप्टेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मुक्तीसंग्राम*
मुक्तीचा आक्रोश झाला ,मराठवाडा संग्राम।
प्रक्षोभाने जनतेच्या , तो हादरला निजाम।।
अंगार पेटली होती,तनोमनी माणसात।
गुलामी झुगारुन सज्ज विलीनीकरणात।।
पारतंत्र्य बोचणारे ,जखमी ह्रदयी होते।
अविभाज्य भारताचे, संस्थान का नव्हते?
तो अन्याय अत्याचार,रझाकारी खूप केले।
जुलमी महसूल कर , त्या शोषणानी मेले।।
हा लढा मुक्तीसंग्राम , नव्हताच राजकीय।
धर्म अर्थ सामाजिक,स्थिरतेचा मानवीय।।
सप्टेंबर सतराला , निजाम शरण आला।
सरदार पटेलांचा , जगी जयघोष झाला।।
या नभात भारताचा, फडकला रे तिरंगा।
संविधान साक्षी आहे,गोदा हिमालय गंगा।।
जुनागढ हैद्राबाद , मराठवाडा संस्थान ।
शोभून दिसते भारती,कडेवर भाग्यवान।।
*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा,जि.यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तिसंग्राम*
दीडशे वर्ष राज्य करुनी,
इंग्रजांनी गुलाम केले।
मुक्तिसंग्राम लढुनी थोरांनी,
गुलामीतून देश मुक्त केले।।
लढले शेतकरी, शेतमजूर,
देशासाठी एकजुटीने।
दिले बलिदान राष्ट्रासाठी,
गाऊया थोरवी एकमताने।।
मुक्तिसंग्राम चालताना,
अनेक टप्यातुन गेलो।
तेव्हा कुठे मोकळा श्वास,
आनंदाने आम्ही जगलो।।
पेटून उठली जनता सारी,
मुक्तिसंग्राम चालत होता।
प्रत्येकाच्या योगदानातून,
स्वातंत्र्यस्वप्न खुलवत होता।।
मुक्तिसंग्राम संपला तेव्हा,
देश स्वतंत्र झाला होता।
परत एकदा वाटते पुन्हा,
घडावा मुक्तिसंग्राम आता।।
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तीसंग्राम*
कुणी लढले रक्तरंजित
कुणी लढले शस्त्राविना
भारतभूच्या स्वातंत्र्याचा
इथे छेळला युद्ध घणा
निर्भीडपणे छाताड्यावर
कुणी झेलेल्या गोळ्या
कुणी घेतला हसतमुखाने
फाश आपुल्या गळ्या
देशभक्ताच्या कर कर्माला
अखेर आले यश..
दिडशे वर्षाच्या पारतंत्र्याचा
तुटला शेवटी पाश…
भारतभूवर वाहू लागला
हर्षभरित स्वातंत्र्य वात
मात्र मराठवाडा अजूनही
निजामशाहीच्याच हुकुमात
अत्याचारात त्रस्त जनतेने
मनात बांधला चंग..
मराठवाडा मुक्तीसंग्रामाची
मग छेडली गेली जंग..
हाती घेऊन जंगाची धुरा
स्वामी रामानंद ठाकले पुढे..
बिंदू,नाईक,वैशपायन,काबरा
परांजपे,रेड्डीने ओढले रणगाडे..
घणाघाती युद्ध जुंपले
बलिदानात सांडले रक्त
परि,जराही न मागे हटले
ते विरक्त निर्भयी देशभक्त..
गांधीजीच्या आदेशान्वये
सरसावले पुढे लोहपुरुष…
भारतभूमीच्या सैनिकापुढे
मावळला निजामी जोष..
स्वतंत्र झाला मराठवाडा
हर्षात उजाळला पर्व नवा..
बलिदान त्या देशभक्तांचे
अभिमानाने उरात ठेवा..
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तिसंग्राम*
निजामाच्या जुलमाने
त्रस्त होती जनता
स्वातंत्र्य मिळूनही
गुलामीत होती जनता
दहशतीने रझाकारांनी
सुरू केले अत्याचार
सारी जनता दडपशाहीने
झाली होती बेजार
आंदोलनाचे नेतृत्व केले
स्वामी रामानंद तीर्थांनी
कार्य सुरू झाले मराठवाडा
मुक्तिसंग्रामची ज्योत पेटवुनी
पोलादी पुरुष पटेलांनी
कारवाईस सुरुवात केली
‘पोलीस ऍक्शन’ नावाने
ती इतिहासात अमर झाली
अनेक वीर अन् विरांगणा
मराठवाडा मुक्त करण्या लढले
हैदराबादी संस्थान अखेर
स्वतंत्र भारतात विलीन झाले
निजामाच्या हुकूमशाहीतून
मराठवाडा मुक्त झाला
हिंदूस्थानातील स्वातंत्र्य लढा
हा लोकविलक्षण ठरला
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तीसंग्राम*
काळीज पिळवटणारा ठरला
भारतमातेचा मुक्तीसंग्राम
क्रांतीविरांच्या बलीदानाने
जगतो उंचावून आपुली मान ॥
तोडून जंजीरे अन्यायाची
उसळली रक्तात क्रांतीची लाट
हाक ऐकूनी भारतभूची
घातला बलीदानाचा घाट ॥
१८५७ चा उठाव
ठरला स्वराज्याचा हुंकार
फासावर लटकतांनाही
निनादला क्रांतीपुत्रांचा झंकार ॥
सत्याग्रहाच्या दिपाने उजळला
गुलामीचा अंधःकार मावळला
शहीदांच्या रक्तातून ओघळला
स्वातंत्र्याचा दिन त्यांच्या त्यागातून उजळला ॥
अभिमानाने रडली माता
पाहून त्या धैर्याच्या गाथा
स्वातंत्र्याचा पडला प्रकाश
म्हणून घेतो आज मोकळा श्वास ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तिसंग्राम*
स्वातंत्र्य मिळाले भारताला
तरी मराठवाडा होता गुलाम
हुकूमत हैद्राबाद संस्थानाची
गाजवीत होता तवा निजाम
स्वातंत्र्यानंतर,स्वातंत्र्यासाठी
द्यावा लागला होता तो लढा
निजामाचा अट्टाहास स्वतंत्र
प्रश्न सोडवावा कसा हा तिढा
कासिम रझवीचे रझाकाराने
केला तो आमानुष अत्याचार
पेटून उठले घराघरात सेनानी
करी जाचजुलमाचा प्रतिकार
स्वातंत्र्य सेनानी रामानंद तीर्थ
वैचारीक आव्हाना आला अर्थ
सक्रिय लढ्यात पुरुष,महिला
सहभाग घेत लढा झाला सार्थ
१७ सप्टेंबर १९४८ उजाडला
निजामाचे जाचातून मुक्त केले
मुक्तिसंग्राम लढ्यात सहभागी
स्वातंत्र्य सैनिक गौरविले गेले
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



